कुडाळसह मालवणसाठी ६ कोटी ७० लाख

कुडाळसह मालवणसाठी ६ कोटी ७० लाख

Published on

कुडाळसह मालवणसाठी ६ कोटी ७० लाख
‘जलयुक्त शिवार’ अंतर्गत निधी; १७ कामांना मिळणार गती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये आता ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत कुडाळ आणि मालवण तालुक्यांसाठी तब्बल ६ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे दोन्ही तालुक्यांतील एकूण १७ कामांना गती मिळणार असून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील १४ कामांसाठी ५ कोटी ७० लाख, तर मालवण तालुक्यातील ३ कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कुडाळ तालुक्यातील सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या कामांमुळे जलस्तरात वाढ होण्यास मदत होणार आहे. यात माणगाव ढोलकरगाव ७८.७१ लाख सिमेंट नाला बंधारा, पणदूर माऊली मंदिर ८१.७४ लाख कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, पडवे थोरले तलाव ६४.८४ लाख, घावनळे गावठाणवाडी ५६.४१ लाख, हुमरस वारंगवाडी ४४.८५ लाख, रायगाव माड्याचीवाडी ३०.५८ लाख, कुंदे परबवाडी ३०.१० लाख, जांभवडे व मोरे प्रत्येकी २९.८२ लाख, निवजे चव्हाटवाडी २८.९७ लाख, चेंदवण वेलवाडी २५.८६ लाख, पावशी मिटक्याची वाडी २४.८८ लाख, वर्दे मांगरवाडी व चेंदवण प्रत्येकी २१.५६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मालवण तालुक्यात ३ महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात कातवड पाळशीवाडी ५६.२६ लाख, रामगड २१.०७ लाख, रामगड २२.३७ लाख रुपये मंजूर केले आहेत.
मतदारसंघात सिंचनाची सोय व्हावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यावर आमचा भर आहे. या मंजूर कामांमुळे संबंधित गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होईल, असे आमदार नीलेश राणे यांनी स्पष्ट केले. या विकासकामांच्या मंजुरीमुळे कुडाळ-मालवणमधील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com