सूर्यनमस्कारातून सुदृढ होत राष्ट्रकार्य करा
rat८p१०.jpg-
P२६O१६३५१
रत्नागिरी : दामले विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळेबुवा पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात आफळेबुवांचे स्वागत करताना मुख्याध्यापक भगवान मोटे.
----
सूर्यनमस्कारातून सुदृढ होत राष्ट्रकार्य करा
आफळेबुवा ः दामले विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : मुलांनी आपल्या आई-वडिलांचे व शिक्षकांचे ऐकले पाहिजे. दररोज सूर्यनमस्कारासारखा व्यायाम केला पाहिजे. त्यातून सुदृढ झालेल्या शरीराचा उपयोग स्वतःबरोबरच राष्ट्रकार्यासाठी केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी रामायणातील मारुतीचा आदर्श ठेवावा आणि आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्तबुवा आफळे यांनी केले.
येथील दामले विद्यालयात चैतन्य संवाद या कीर्तनसंध्या परिवाराच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. विद्यार्थ्यांसमोर त्यांनी रामायणातील मारुतीच्या वेगवेगळ्या कथा सांगून विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श का आणि कसा ठेवावा, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. लहानपणी मारुतीने ऋषींना त्रास दिल्यामुळे. त्याला दुर्वास ऋषींनी शाप दिला होता. त्याला आपल्यामधील क्षमतांचे स्मरण होणार नाही, असा तो शाप होता. रावणाने माता सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला लंकेत शोधायला जाण्याच्या वेळी जांबुवंताने मारुतीला त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतांचे स्मरण करून दिले. त्यामुळे तो १०० योजने दूर असलेल्या लंकेत उड्डाण करून जाऊ शकला.
हनुमंत लंकेत पोहोचल्यावर त्याने प्रभू श्रीराम-रावण युद्धाची शक्यता लक्षात घेऊन लंकेतील विविध स्थळे पाहून घेतली. सैन्याच्या छावण्या, भोजनाची व्यवस्था, लंकेमधील वेगवेगळ्या इमारती, राजप्रासाद अशा विविध ठिकाणांचा अभ्यास केला. त्याचा उपयोग तो पुन्हा आल्यानंतर रामाने रावणाशी युद्ध करताना झाला. त्यामुळे रावण पराभूत झाला. एकाग्रतेने, चौकसपणे आणि अभ्यासपूर्वक त्याने हे सर्व केल्यामुळे त्याचे नाव आजही घेतले जाते. मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी, उमेश आंबर्डेकर, निबंध कानिटकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

