दांडी दांडेश्वर मंदिर-शाळा रस्ता झाला प्रकाशमान
१६४१७
दांडी दांडेश्वर मंदिर-शाळा
रस्ता झाला प्रकाशमान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : शहरातील दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून असलेले अंधाराचे साम्राज्य आता दूर झाले आहे. भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या मार्गावर १९ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचे लोकार्पणही करण्यात आले. भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका सेजल परब तसेच भाजप उपतालुकाध्यक्ष सन्मेष परब यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. श्री देव दांडेश्वर मंदिराचा जत्रोत्सव जवळ येत असल्याने भाविकांची आणि पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. दांडी शाळा ते मंदिर हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. आता हा मार्ग प्रकाशमान झाल्याने दांडीवासीयांकडून समाधान व्यक्त होत आहे. या सौर पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नागरिक गिरीधर आचरेकर व शरद आगवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी नगरसेविका अन्वेषा आचरेकर, सेजल परब, सन्मेष परब यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

