गुहागर - विकासाचे व्हिजन कायम
rat9p11.jpg
16522
पाली ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या भेटीप्रसंगी गुहागर येथील गौरव वेल्हाळ आणि सहकारी.
गुहागरच्या विकासाचे व्हिजन कायम
गौरव वेल्हाळः निष्ठावान कार्यकर्त्यांनी घेतला भगवा
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ९ः माझे वडील स्वर्गीय आप्पांचे सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्ही दुसऱ्या पक्षात असतानाही आमचे घरचे ऋणानुबंध जपले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गुहागरचा कायापालट करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष बदलला तरी गुहागरच्या विकासाचे माझे व्हिजन कायम राहील, असे मत शृंगारतळी येथील गौरव वेल्हाळ यांनी व्यक्त केले.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर गुहागर तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. तालुक्यातील शृंगारतळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सक्रिय कार्यकर्ते आणि कै. सुशील वेल्हाळ यांचे सुपुत्र गौरव वेल्हाळ यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या प्रसंगी गुहागर तालुक्यातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. त्यात प्रामुख्याने प्रशांत भुवड, प्रमोद भुवड, वैभव आदवडे, अजित बेलवलकर, संदीप मांडवकर, दीपक कदम, वैभव वेल्हाळ, नंदकुमार पालकर, पिंट्या वेल्हाळ, अभिजित वेल्हाळ, सुनील बेंद्रे, गणेश मोरे, आकाश जाधव, सुरज बेंद्रे, राजेंद्र भोजने, अवधूत वेल्हाळ, मोहसिन मालगुंडकर, साहिल बेल्हाळ, प्रित वेल्हाळ, आर्या बेल्हाळ आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

