रत्नागिरी- तीन दिवसांच्या संगीत नाट्य महोत्सवाला प्रतिसाद
rat9p4.jpg
O16524
रत्नागिरी : खल्वायन व एनसीपीए आयोजित संगीत नाट्य महोत्सवात संगीत शांतिब्रह्म या नाटकातील एक क्षण.
तीन दिवसांच्या संगीत नाट्य महोत्सवाला प्रतिसाद
एनसीपीए, खल्वायनतर्फे आयोजन; रसिकांना अनोखी पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत रंगभूमीची परंपरा जपण्यासाठी गेली २८ वर्षे कार्यरत असलेल्या खल्वायन संस्थेच्या सहकार्याने एनसीपीए मुंबई व सिटी यांच्यावतीने तीन नाटकांचा संगीत नाट्य महोत्सव उत्साहात झाला. स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात संगीत संशयकल्लोळ, संगीत शांतिब्रह्म आणि संगीत प्रीतीसंगम या तीन अजरामर संगीत नाटकांचे दिमाखदार सादरीकरण झाले.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या हस्ते नटराजपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी स्वागत केले. या प्रसंगी उद्योजक दीपक गद्रे, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक संघाचे कार्यवाह राजन पटवर्धन, गायक राजाभाऊ शेंबेकर आणि प्रमोद कोनकर प्रमुख उपस्थित होते.
पहिल्या दिवशी ५३व्या राज्य नाट्य महोत्सवात प्रथम विजेत्या संगीत संशयकल्लोळ नाटकाने रसिकांना खळखळून हसवले नंतर संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित पुरस्कारप्राप्त संगीत शांतिब्रह्म नाटकाचे प्रभावी सादरीकरण झाले. नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे नाटक संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित होते. देखणे नेपथ्य, आशयघन कथानक, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीच्या भारूड, अभंग, गवळण या गायनप्रकारातील कर्णमधूर नाट्यपदांनी हे नाटक रंगतदार झाले. शेवटच्या दिवशी प्र. के. अत्रे लिखित, संत सखूच्या जीवनावर आधारित संगीत प्रीतीसंगम या नाटकाने महोत्सवाची सांगता झाली. ट्रीकसीनने नटलेले बहारदार नाटक रंगले. सुमधूर नाट्यपदांनी हे नाटक अधिक आकर्षक झाले.
चौकट १
दरवर्षी महोत्सव व्हावा
या सर्व नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले. रत्नागिरी, चिपळूण व देवगड परिसरातील कलाकारांच्या सहभागामुळे महोत्सव अधिक रंगतदार झाला. दररोज पाचशेहून अधिक रसिकांनी संगीत नाट्य मेजवानीचा आस्वाद घेतला. असा महोत्सव दरवर्षी व्हावा, अशी अपेक्षा अनेक नाट्यरसिकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

