ओहोळावरील कमकुवत पुलाकडे दुर्लक्ष
16554
ओहोळावरील कमकुवत पुलाकडे दुर्लक्ष
उपसरपंच गावकर ः सोनुर्ली-निगुडे मार्गावर मृत्यूचा सापळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः सोनुर्ली-निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेला ओहळावरील पूल पूर्णतः कमकुवत झाले असून, आठ दिवसांत यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर २६ जानेवारीला उपोषण छेडण्याचा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, की ‘सोनुर्ली ते निगुडे या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण केले. मात्र, या मार्गावरील महत्त्वाच्या पुलाचे काम प्रलंबित ठेवले. सध्या या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून तो कमकुवत झाला आहे. गेल्या पावसाळ्यात या पुलाची संरक्षण भिंत कोसळली होती. येत्या पावसाळ्यापूर्वी जर या पुलाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती झाली नाही, तर हा पूल वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.
हा रस्ता स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पूल कोसळला तर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल, ज्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण सातत्याने या पुलाच्या कामाची मागणी प्रशासनाकडे करत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही.त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून आपण उपोषणाचे हत्यार अवलंबले आहे.’
--------
...तर संबंधित विभाग जबाबदार
‘येत्या आठ दिवसांत या पुलाबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास, प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याण्या निर्णय उपसरपंच गावकर यांनी घेतला आहे. उपोषणादरम्यान काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील,’ असा इशाराही उपसरपंच गावकर यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

