शूटिंग बॉलचा संघ माळशिरसला रवाना
शूटिंग बॉलचा संघ
माळशिरसला रवाना
सावर्डेः रत्नागिरी जिल्ह्याचा शूटिंग बॉलचा संघ गुरूवारी (ता. ८) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी रवाना झाला. ४४ व्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी ही चाचणी आयोजित केली आहे. या खेळात रत्नागिरीच्या खेळाडूंनी कठोर सराव करत कंबर कसली आहे. मुराद खलपे यांच्या नेतृत्वाखाली संघ विजयध्वज फडकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. रत्नागिरी जिल्हा निवडक संघात शारीक खलपे, जियान मेमन, ओंकार शिंदे, निशांत भोजने, आदित्य कांबळे, अजय वास्कर, अफरोज आलेकर यांचा समावेश आहे. जिल्हा संघनिवडीसाठी सलीम मेमन व क्लबमधील खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
----------
पावस गावामध्ये
बायोचार प्रात्यक्षिके
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मंडळ पावस येथे उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख आणि तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी ठिकठिकाणी नर्सरी तपासणी केली. या प्रसंगी वर्षा गोरिवले (गोळप), अक्षय गुरव (पावस), उपेंद्र जोशी (गोळप) यांच्या शेतामध्ये बायोचार प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रसंगी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये कीटकशास्त्रज्ञ संतोष वानखेडे, अमोल सकपाळ, नडगिरी उपस्थित होते.
----------
वक्तृत्व स्पर्धेत
दुर्वांक शिंदेचे सुयश
चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक स्व. गोविंदराव निकम याच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खेर्डी-चिंचघरी विद्यालयातील दुर्वांक शिंदे याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्याने ‘घरात हवेत आजी-आजोबा’ या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले. जिल्ह्यातून अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका अपूर्वा शिंदे यांनी करून घेतली होती. संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक आदींनी त्याचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

