ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन मांडकी-पालवणला
rat9p14.jpg-
16570
रत्नागिरीः ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाची माहिती देताना प्रकाश देशपांडे. सोबत डावीकडून राजेंद्र सुर्वे, गजानन पाटील, दीपक पटवर्धन, बाबाजी जाधव, अरूण इंगवले, जयवंत जालगावकर आदी.
----------
मांडकीत कृषी, सहकार साहित्य संमेलन
चोरगे शिक्षणसंस्थेचा पुढाकार; उद्घाटनाला शरद पवार यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः ग्रामीण जीवन आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व सहकार क्षेत्राला साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षणसंस्थेच्यावतीने १४ व १५ फेब्रुवारी रोजी राज्यातील पहिल्या आगळ्यावेगळ्या ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि कृषीतज्ज्ञ कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची एकमताने निवड केली आहे, अशी माहिती संमेलनाचे नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष अरूण इंगवले यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक दीपक पटवर्धन, जयवंत जालगावकर, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे उपस्थित होते. राज्यात सहकार साहित्य संमेलन प्रथमच आयोजित केले जात आहे. याचे स्वागताध्यक्षपद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे भूषवणार असून, डॉ. निखिल चोरगे प्रमुख कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
संमेलनाच्या उद्घाटनाला खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
कृषी, ग्रामीण आणि सहकार या तिन्ही क्षेत्रांत डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अष्टपैलू कामगिरी केली आहे. ५०हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी ग्रामीण जीवनावर कादंबरी, नाटके आणि कथासंग्रह लिहिलेली आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कायापालट करून ''नक्त एनपीए'' शून्य टक्क्यांवर आणण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या याच अनुभवाचा आणि साहित्याचा लाभ या संमेलनाला मिळावा यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. तानाजीराव चोरगे यांची निवड केली आहे. मांडकी-पालवण येथे होणाऱ्या दोनदिवसीय संमेलनात महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, कृषितज्ज्ञ आणि नामवंत साहित्यिक सहभागी होणार आहेत. यासोबतच भव्य पुस्तक प्रदर्शन हे संमेलनाचे मुख्य आकर्षण असेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, पोपटराव पवार यांचीही विशेष उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.
चौकट
७ परिसंवादांचे आयोजन
ग्रामीण कथाकार, कवी आणि शाहिरांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे संमेलन महत्वाचे ठरणार आहे. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचे ज्ञान साहित्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. राज्यभरातील सुमारे ५ हजाराहून अधिक लोकं येथे येणार आहेत. यामध्ये विविध विषयांवरील ७ परिसंवाद आयोजित केले आहेत. त्यांचे विषय सहकार, कृषी, ग्रामीण जीवन यावर आधारित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

