चिपळूण-अमेरिकन शेळी, परदेशी पोपट, बैलाच्या जोडीने खल्ला भाव

चिपळूण-अमेरिकन शेळी, परदेशी पोपट, बैलाच्या जोडीने खल्ला भाव

Published on

ratchl91.jpg
16594
चिपळूण ः पशुधनाची पाहणी करताना नागरिक.
rat9p20.jpg
16590
अमेरिकन शेळी
rat9p21.jpg
16591
प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरलेला वेगाचा शेवट सर्जा.
---------------

अमेरिकन शेळी, परदेशी पोपट, बैलाच्या जोडीने खाल्ला भाव
चिपळुणात कृषी महोत्सव ; पशुधन पाहण्यासाठी अन् छबी टिपण्यासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ः येथील वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवाला कोकणवासियांची अलोट गर्दी होत असून, पशुधनासह पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बैलगाडा शर्यतीमधील नामवंत बैलांची छबी टिपण्यासाठी एकच गर्दी होत आहे. अमेरिकन शेळी, परदेशी पोपट, सुंदरी म्हैस, घोडे, टर्की कोंबडा, बकासूर बैल अशा अनेकविध प्राणी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.
शहरातील बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानावर ५ जानेवारीपासून भव्य स्वरूपात कृषी महोत्सवाला सुरवात झाली. पहिल्या दिवसापासूनच येथे नागरिकांची गर्दी होत आहे. पशुधनमध्ये जास्त दूध देणारी म्हैस आणि गाय सुदृढ निरोगी बैल व रेडा अशा वेगवेगळ्या प्रकारात ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र आणि सहभागी सर्व शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रदर्शनास सर्वात कमी उंचीची राधा म्हैस, बैलगाडा शर्यतीमधील विजेता बैल राजा, सोना रेडा, बकासूर बैल, चार किलो वजनाचा कोंबडा, टर्की कोंबडा, परदेशी पोपट, अमेरिकन बकरी, पांढरीशुभ्र उमदे घोडे, वळू, लाल कंधारी जातीच्या गायी, सुंदरी म्हैस असे आगळेवेगळे पशुधन पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘चिक्या आणि सर्जा’ तर चौथ्या दिवशी ‘वेगाचा शेवट सर्जा’ या बैलजोड्यांनी कृषी महोत्सवात खास रंगत आणली. एका खास प्लॅटफॉर्मवर ‘चिक्या-सर्जा-वेगाचा शेवट सर्जा’ सर्वांना दर्शन देत होते. या नामवंत बैलजोड्यांची छबी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपण्यासाठी गर्दी झाली होती. महोत्सवात गोड व तिखट पाककला स्पर्धा झाली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दर्जेदार पदार्थ बनवले. मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी विशेष लक्ष देऊन ही स्पर्धा यशस्वी करून घेतली.

(चौकटीला हा फोटो घ्यावा)
16593
rat9p23.jpg

चौकट
घरांचा ग्रामीण लुक लक्षवेधक
कृषी महोत्सवातील ग्रामीण ‘लुक’ असलेली घरे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या महोत्सवात जुन्या पद्धतीचे समाधान नावाने घर उभारले आहे. ते पाहिल्यावर जुने दिवस आठवल्याशिवाय राहत नाहीत. महोत्सवात आलेला प्रत्येकजण येथे आवर्जून भेट देत आहे. बांबूचे, लोहाराचे, कुंभाराचे घर ही घरेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लाईव्ह फळबाग लागवडीचे डेमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com