रत्नागिरी- हापूस ॲग्रो संघाला बाबरशेख क्रिकेट चषक

रत्नागिरी- हापूस ॲग्रो संघाला बाबरशेख क्रिकेट चषक

Published on

rat9p17.jpg-
16573
रत्नागिरी : बाबरशेख क्रीडा मंडळाच्या हातिस क्रिकेट स्पर्धेचा विजेता हापूस ॲग्रो, पावस संघाला प्रदान करताना मंडळाचे पदाधिकारी.
-----------

‘हापूस ॲग्रो’स बाबरशेख क्रिकेट चषक
स्पर्धेचे ४९वे वर्ष; नाचणे संघ ठरला उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : हातीस येथील बाबरशेख क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे यंदा ४९ वर्षे होते. या स्पर्धेतील मानाचा चषक पावस येथील हापूस ॲग्रो संघाने पटकावला. श्रीधा श्रीनय नाचणे संघाला उपविजेतेपद मिळाले. हापूस ॲग्रो संघास मानाचा चषक व रोख रक्कम ४९ हजार ४९ रु. व उपविजेत्या नाचणे संघास चषक व रोख रक्कम २५ हजार ४९ रुपये देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेत एकूण ४६ संघांनी सहभाग नोंदवला होता. ‘आयकॉन खेळाडू’ ही विशेष संकल्पना राबवण्यात आल्याने टेनिस क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास हातिस मंडळाचे पदाधिकारी, सरपंच अशोक नागवेकर, दादा दळी, महेंद्र झापडेकर, विजय साळवी, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप नागवेकर, विजय नागवेकर, राजेंद्र नागवेकर, तुषार नागवेकर, नरेश विलणकर, पोलिस पाटील संतोष नागवेकर, क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष केतन कीर उपस्थित होते.
अंतिम सामन्याचा सामनावीर अहमद नाखवा ठरला. स्पर्धेतील आकर्षक खेळाडूचा मान रणजीत फराटे यांना मिळाला. सर्वाधिक षट्कारांचा किताब रोहित भालेराव याने पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निखिल सारंग तर संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अक्षय सावंत यांची निवड केली. मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रणय मुरकर याचा गौरव करण्यात आला. ४९व्या वर्षाचा ‘सिल्व्हर बॉय’ किताब अरफान नाखवा यांना प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com