कलमठ-लांजेवाडीत
२० ला डान्स स्पर्धा

कलमठ-लांजेवाडीत २० ला डान्स स्पर्धा

Published on

कलमठ-लांजेवाडीत
२० ला डान्स स्पर्धा
कुडाळ : श्री गणेश कृपा मित्रमंडळ, कलमठ-लांजेवाडी यांच्या वतीने श्री गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव व मंडळाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय खुली एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा मंगळवारी (ता. २०) सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ७ हजार १, ५ हजार ५०१, ४ हजार १ रुपये तसेच उत्तेजनार्थ १ हजार ५०१ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेबाबत माहितीसाठी सागर पाष्टे व महेश परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.

ई-आर १ विवरणपत्र
ऑनलाईन भरा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडील मनुष्यबळाचे माहे डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे ई-आर १ विवरणपत्र येत्या ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती प्रत्येक तिमाहीनंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित विवरणपत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे. ऑनलाईन प्रक्रिया करताना अडचण येत असल्यास सहायक आयुक्त कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

सेवा सोसायट्यांनी
प्रस्तावांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाची शिफारस घेऊन नोंदणीकृत झालेल्या सेवा सोसायट्यांनी काम मिळण्यासाठीचे प्रस्ताव व दरपत्रक येत्या मंगळवार (ता. १३) पर्यत सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वहस्ते सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने शासन निर्णयानुसार प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा देण्यासाठी जिल्हास्तरीय काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विविध शासकीय कार्यालयांकडून कंत्राटी कामांसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा आलेले किंवा अपूर्ण प्रस्ताव अपात्र ठरविण्यात येतील, याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

राज्य क्रीडा दिनानिमित्त
जिल्ह्यात विविध उपक्रम
सिंधुदुर्गनगरी ः ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन (१५ जानेवारी) राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली. या दिवशी खाशाबा जाधव यांची जीवनगाथा, क्रीडा क्षेत्रातील योगदान यावरील व्याख्याने, क्रीडा संस्कृती जतनासाठी रॅली व मॅरेथॉन स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा मार्गदर्शन शिबिरे, ऑनलाईन माध्यमातून नामवंत खेळाडूंशी संवाद, विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने, विजेत्यांचा सन्मान तसेच क्रीडा क्षेत्रातील करिअर संधींबाबत परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व उपक्रमांचा अहवाल
sindhusports1@gmail.com या ई-मेलवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com