राजापूर नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्या

राजापूर नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्या

Published on

-rat९p३०.jpg-
२६O१६६४०
राजापूर ः मिळंद सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने नागरिकांना कापडी पिशव्या व कचराकुंडीचे वाटप करताना सरपंच कीर्ती आयरे, सोबत ग्रामस्थ महिलावर्ग.
----
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्या
कीर्ती आयरे ः मिळंदमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः गावातील प्रत्येक नागरिकाने कोणतीही गोष्ट केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. घनकचरा व सांडपाण्याचे योग्य नियोजन आणि प्लास्टिकचा त्याग करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला तरच भविष्यात आपल्याला सुदृढ जीवन जगता येईल, असे प्रतिपादन राजापूर तालुक्यातील मिळंद-सावडाव सरपंच कीर्ती आयरे यांनी केले.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत प्लास्टिकमुक्ती व घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांना कापडी पिशव्या वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्राथमिक शाळा मिळंद, प्राथमिक शाळा सावडाव, मिळंद हायस्कूल या शाळांना आणि गावातील सर्व मंदिरांना कचराकुंडी वाटप करण्यात आली. सर्वांना गावातील स्वच्छता, घनकचरा, सांडपाणी, प्लास्टिकबंदीसारख्या विषयावर मार्गदर्शन जनजागृती सरपंच कीर्ती आयरे व ग्रामसेवक अमृता शिवलकर यांनी केले. प्रत्येकाने या वस्तूचा वापर करून परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून प्रत्येकाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले. या वेळी सरपंच कीर्ती आयरे, ग्रामसेवक अमृता शिवलकर, उपसरपंच रवींद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य नेहा गुरव, विजया माने, माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप आयरे, मिळंद हायस्कूलचे मुख्याध्यापक योगेश आयरे, सामाजिक कार्यकर्ते अंबाजी गुरव, रमाकांत मोरे, संजू मोरे, रघुनाथ माने, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com