धारावीतील दोन प्रभागांचे सदानंद चव्हाण प्रभारी
धारावीतील दोन प्रभागांचे सदानंद चव्हाण प्रभारी
चिपळूण ः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन प्रभागांसाठी प्रभारी म्हणून शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. धारावीतील प्रभाग क्र. १८७ आणि १८८ या दोन प्रभागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी देत सदानंद चव्हाण यांच्यावर विश्वास टाकला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. राज्यातील शिवसेना-भाजप महायुतीसह उद्धव ठाकरे सेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे. काँग्रेस या ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. राज आणि उद्धव एकत्र आल्याने राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. प्रचाराच्या याच धामधुमीत एकनाथ शिंदे यांनी चिपळूणचे माजी आमदार चव्हाण यांना प्रभाग १८७ व १८८ या प्रभागाचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. या विभागात ठाकरे सेनेचे अनिल देसाई खासदार आहेत, तर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड आमदार आहेत.
संगमेश्वरमध्ये लायन्स महोत्सव फनफेअर
संगमेश्वर ः लायन्स क्लबचे अध्यक्ष रविकांत शिंदे तसेच सर्व पदाधिकारी व लायन्स महोत्सव अध्यक्ष विवेक शेरे यांच्या माध्यमातून आयोजित लायन्स महोत्सव फनफेअर संगमेश्वर येथील पावटा मैदान येथे होणार आहे. या महोत्सवात आकाश पाळणा, ब्रेकडान्स, टोरा टोरा आणि लहान मुलांसाठी खास मिकी माऊस व ट्रेन उपलब्ध असणार आहेत. तसेच खाद्यप्रेमींसाठी चटपटीत चाट दाबेली, मोमोज, शोरमा, भाकरी मटण तसेच चायनीज पदार्थ व विविध व्यंजनदेखील असणार आहेत. तसेच गृहोपयोगी वस्तू खेळणी आणि कपड्यांचे विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

