राजापूर-लांजा नागरिक संघाचे पुरस्कार जाहीर

राजापूर-लांजा नागरिक संघाचे पुरस्कार जाहीर

Published on

राजापूर-लांजा नागरिक संघाचे पुरस्कार जाहीर
लांजा, ता. ९ ः राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेच्यावतीने दिले जाणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी दिली.
तालुक्यातील रिंगणे येथे ३० जानेवारी आणि १ फेब्रुवारीला ११वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या निमित्ताने या दोन तालुक्यातील साहित्य, कला, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, ग्रामीण महिला विकास या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कर्तृत्ववान व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सानेगुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार श्रद्धा दळवी (तिवरे) व‌ विशाल मोरे (रत्नागिरी) यांना जाहीर झाला आहे. प्रा. मधु दंडवते आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल कदम (कोंडगे) व‌ अमोल टाकळे (चिपळूण) यांना, ‌नाटककार ला. कृ. आयरे कलाश्री पुरस्कार मधुकरबुवा तावडे (झर्ये) व सुनीलबुवा जाधव (प्रभानवल्ली) यांना देण्यात येणार आहे. उद्यम पुरस्कार संदेश र. पेडणेकर (रिंगणे) व‌ स्वरूप गुरव (लांजा) यांना देण्यात येणार आहे. माऊली पुरस्कार दिगंबर हांदे (रिंगणे) व‌ नारायण गोसावी (मळगाव सावंतवाडी) यांना दिला जाणार आहे.
बळीराजा पुरस्कार चंद्रहास दादा नारकर (पाचल) व प्रभाकर चव्हाण (कोंडगे), नारायण तावडे जनमित्र पुरस्कार संतोष पांचाळ (सर्कल अधिकारी) व संतोष चव्हाण (ग्रामअधिकारी, राजापूर) यांना दिला जाणार आहे. बॅ. नाथ पै सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अभिजित हेगशेट्ये (रत्नागिरी) व‌ सुहास चव्हाण (वाटूळ) यांना दिला जाणार आहे. आदर्श गृहिणीचा पुरस्कार प्रमिला सुतार (राजापूर), वसुंधरा पेडणेकर (लांजा), साध्वी सावित्रीबाई फुले सामाजिक महिला कार्यकर्ता पुरस्कार मीना दर्णे (रायगड), साक्षी जैतापकर (मिठगवाणे) यांना देण्यात येणार आहे. पत्रकार गजाभाऊ वाघदरे अक्षरमित्र पुरस्कार विजयराज बोधनकर (वर्धा) व‌ अजय कांडर (कणकवली) यांना, क्रीडारत्न पुरस्कार मानसी संजय हांदे (रिंगणे) व रेयांश खामकर (आरगाव) दिला जाणार आहे.

चौकट
संस्था, कार्यकर्ता पुरस्कार
संस्था कार्यकर्ता पुरस्कार अनंत चाळके (कुरंग), जनार्दन बाळकृष्ण पाटोळे जीवनगौरव पुरस्कार, शामराव पानवलकर (लांजा), श्रीमती रजनी गोपाळ पांचाळ जीवनगौरव पुरस्कार सीताराम सांडम गुरूजी (रिंगणे), कोकण भूषण पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांना दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com