एमव्हिटीव्ही पतपेढीच्या अध्यक्षपदी जागृती गांगण
- rat९p२७.jpg-
P२६O१६६२८
जागृती गांगण
-----
‘एमव्हीटीव्ही’ पतपेढीच्या अध्यक्षपदी गांगण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ ः ‘एमव्हीटीव्ही’ सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी जागृती जयवंत गांगण यांची निवड झाली असून, संस्थेच्या स्थापनेपासून या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या या निवडीमुळे सहकार क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
गांगण या १९९५ पासून पतपेढीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेत ‘डेप्युटी सुपरिटेंडंट’ या उच्चपदावर काम करत असतानाच त्यांनी पतपेढीच्या संचालकपदाची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे सांभाळली. त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि दांडगा जनसंपर्क पाहून संस्थेने त्यांची आधी सचिव त्यानंतर उपाध्यक्ष आणि आता अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. एमव्हीटीव्ही पतपेढीचा आलेख सध्या उंचावत असून, पतसंस्थेचे एकूण सभासद ६० हजारापेक्षा जास्त असून, व्यवसाय ३२७ कोटी रुपयांवर आहे. आगामी काळात ५०० कोटींचा व्यवसाय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. सभासदांना सातत्याने १२ ते १५ टक्के लाभांश दिला जातो. सध्या चार शाखा कार्यरत असून, लवकरच पनवेल आणि कोल्हापूर येथे नवीन शाखा सुरू होणार आहेत. गांगण यांच्या यशात त्यांचे पती जयवंत गांगण यांचे मोठे सहकार्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

