-स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेकडून विक्रांत लवेकर
-rat९p३७.jpg-
P२६O१६६६३
विक्रांत लवेकर
--------
स्वीकृत नगरसेवकपदासाठी
शिवसेनेकडून विक्रांत लवेकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः चिपळूण पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेकडून उपशहरप्रमुख आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे विश्वासू सहकारी विक्रांत लवेकर यांना संधी देण्यात आली आहे. गटनेते अंकुश आवले यांनी काल त्यांचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला.
चिपळूण पालिका निवडणुकीत पेठमाप प्रभाग क्र.३ मधून शिवसेनेकडून विक्रांत लवेकर यांच्यासह विभागप्रमख प्रमोद बुरटे इच्छुक होते; मात्र सदानंद चव्हाण यांनी त्यांना थांबण्याची सूचना केली. पक्षाचा आदेश मानून लवेकर यांनी माघार घेत प्रमोद बुरटे यांचा मार्ग मोकळा केला. इतकेच नव्हे तर बुरटे यांच्यासह या प्रभागातील मित्रपक्ष भाजपच्या उमेदवार रूपाली दांडेकर यांच्या विजयासाठीदेखील मेहनत घेतली. लवेकर हे पक्षात उपशहरपदावर असून, गेली अनेक वर्षे पक्षाशी प्रामाणिक आहेत; मात्र पक्षासाठी त्यांनी आपल्या उमेदवारीचा त्याग करून पक्षनिष्ठा दाखवली. शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी लवेकर यांना त्यांच्या त्यागाचे योग्य बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला. एका सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाल्याची शहरात चर्चा होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

