स्वच्छता मोहिमेमध्ये का डावलले?

स्वच्छता मोहिमेमध्ये का डावलले?

Published on

16664

स्वच्छता मोहिमेमध्ये का डावलले?

शिंदे शिवसेना नगरसेवक सावंतवाडीत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना घेराओ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः येथील पालिका प्रशासनाकडून बसस्थानक परिसरात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलल्याने आक्रमक झालेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेते बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना घेराओ घालत जाब विचारला. सत्ताधाऱ्यांकडून जाणून-बुजून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत असल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मात्र, मुख्याधिकारी औंधकर यांनी मलाच यासंदर्भात कोणी कल्पना दिली नाही असे सांगून यापुढे सर्व अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
येथील बसस्थानक परिसरात आज पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली. यात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तसेच नगराध्यक्ष याशिवाय काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेचे नगरसेवकही सहभागी झाले होते. मात्र, शिंदे शिवसेनेच्या सातही नगरसेवकांना यासंदर्भात कोणतीही कल्पना किंवा नोटीस पालिका प्रशासनाकडून दिली नव्हती. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेते कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेमध्ये धडक देत प्रभारी मुख्याधिकारी औंधकर यांना जाब विचारला. मात्र, औंधकर यांनी आपल्यालाच या संदर्भात रात्री उशिरा कल्पना देण्यात आली. हा कार्यक्रम प्रशासनाकडून राबवत असताना सर्व नगरसेवकांना कल्पना देणे गरजेचे होते. मात्र, अधिकाऱ्यांनी असे करणे चुकीचे आहे, असे सांगत आरोग्य निरीक्षक विनायक सावंत यांना बोलावून घेत चांगलेच झापले. यावेळी उपस्थित नगरसेवक अजय गोंदावळे यांनी आरोग्य निरीक्षक सावंत यांना जाब विचारताना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे प्रकार तुम्ही जाणून बुजून करतात का? एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा आम्हाला प्रशासनाकडून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही हे पूर्णतः चुकीचे आहे. विकास कामाला आमचा कधीच विरोध नाही. परंतु, प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला नियमानुसार आम्हाला कल्पना किंवा नोटीस देणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर उपस्थित होते.
--------------
असले प्रकार खपवून घेणार नाही!
श्री. कुडतरकर यांनी असा प्रकार यापुढे होता कामा नये तसे झाल्यास प्रशासन म्हणून मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी राहील, त्यामुळे यापुढे प्रत्येक कार्यक्रमात संदर्भात शिंदे शिवसेनेच्या सातही नगरसेवकांना अधिकृतरीत्या नोटीस काढा किंवा फोनद्वारे कल्पना द्या. मात्र, परस्पर कार्यक्रम केल्यास आम्ही कुठल्याही प्रकारे खपवून घेणार नाही. याआधी आम्ही पालिकेमध्ये काम केले आहे. मात्र, सत्ताधारी म्हणूनही आणि विरोधक म्हणूनही असा प्रकार कधीही झाला नाही किंवा आम्ही कोणाच्या बाबतीत केला नाही व आत्ताच असे प्रकार का? हे चुकीचे असून यामध्ये सुधारणा करा, अशा सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com