जानेवारी महिना आकाशदर्शनासाठी सर्वोत्तम
अंतराळाच्या अंतरंगी ..................लोगो
आकाशदर्शनासाठी
जानेवारी महिना सर्वोत्तम
अनादीकाळापासून मानवाने जेव्हा जेव्हा रात्रीच्या निळ्याभोर आकाशाकडे पाहिले असेल तेव्हा त्याला केवळ अनंत चमचमणारे तारे दिसले नसतील तर स्वतःच्या अस्तित्वाचे एक अथांग कोडे पडले असेल. ‘आपण या विशाल विश्वात नेमके कुठे आहोत? हे तारे, हे ग्रह, ही दीर्घिका नक्की कोणाची आणि कशासाठी आहे?’ मानवी मनाला पडलेली हीच आदिम ओढ म्हणजे ‘विश्वाचे आर्त’.‘आर्त’ म्हणजे व्याकुळता, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मस्वरूपाला घातलेले साकडे. विज्ञानाच्या भाषेत ज्याला आपण ‘खगोलशास्त्र’ म्हणतो, ते मुळात या विश्वाचे संगीत समजून घेण्याचा आणि आपल्या अस्तित्वाच्या जाणिवा अनुभवण्याचा मानवी प्रयत्न आहे. कधी दुर्बिणीतून तर कधी गणिताच्या सूत्रांतून आपण हे विश्व उलगडत गेलो आहोत; मात्र, हे विश्व जेवढे समजते त्यापेक्षा कित्येकपटीने ते अधिक गूढ होत जाते.
- rat१०p९.jpg-
- प्रा. बाबासाहेब सुतार
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी.
-----
नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाची असते. जानेवारी महिना आकाशदर्शनासाठी सर्वोत्तम असतो. थंडीची स्थिर हवा आणि प्रदूषणमुक्त आकाश यामुळे ताऱ्यांचे निरीक्षण सोपे जाते. या महिन्यात रात्रीच्या सुरुवातीलाच पूर्वेकडे ‘मृग नक्षत्र’ आपले लक्ष वेधून घेते. या नक्षत्रातील ‘काक्षी’ हा तांबूस तारा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असून, तो ‘सुपरनोव्हा’ होऊन फुटू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. याशिवाय, जानेवारीतील ‘क्वाड्रँटिड्स’ उल्कावर्षावानंतर आता शनी आणि गुरू ग्रहांच्या दर्शनाची मोठी संधी सायंकाळच्या आकाशात आहे आहे.
आज भारत अंतराळ संशोधनात जागतिक महासत्ता म्हणून उभा आहे. २०२६ मध्ये ‘गगनयान’ मोहिमेच्या तयारीला मोठी गती मिळणार आहे. भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या जवळ आहे. हे केवळ एक मिशन नसून भारताचे स्वतःचे ‘स्पेस स्टेशन’ उभारण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. दुसरीकडे, ‘आदित्य L-१’ ही मोहीम सूर्याचा सातत्याने अभ्यास करत आहे. सूर्याच्या ‘कोरोना’मधील उष्णता पृथ्वीवरील हवामान बदलांना कशी कारणीभूत ठरते याचा डाटा आता भारताकडे जमा होऊ लागला आहे. सौरवात आणि सौरडागांचा अभ्यास करण्यात भारताचे योगदान जागतिक स्तरावर मान्य झाले आहे.
खगोलशास्त्र म्हणजे फक्त दुर्बिणीतून पाहणे नव्हे. आईन्स्टाईनने वर्तवलेले भाकीत गुरुत्वाकर्षण लहरी’ शोधण्यासाठी आता भारताचे योगदान महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात साकारत असलेला ‘लिगो-इंडिया’ प्रकल्प जागतिक खगोलशास्त्राचा कणा ठरेल. जेव्हा दोन कृष्णविवरे एकमेकांवर आदळतात तेव्हा अवकाशात निर्माण होणाऱ्या लहरींचे मापन महाराष्ट्राच्या मातीत होईल. ही आधुनिक भारताच्या प्रगतीची मोठी साक्ष आहे.
आपल्या सूर्यमालेबाहेरही लाखो ग्रह आहेत ज्यांना आपण ‘एक्सोप्लॅनेट्स’ म्हणतो. अहमदाबाद येथील ''Physical Research Laboratory'' (PRL) चे शास्त्रज्ञ अशा ग्रहांचा शोध घेत आहेत जिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये नवीन प्रगत उपकरणांच्या मदतीने या संशोधनाला अधिक धार मिळणार आहे.
खगोलशास्त्र हा केवळ शास्त्रज्ञांचा विषय नाही, तो आबालवृद्धांच्या कुतूहलाचा विषय आहे. या जानेवारीत आपण काही गोष्टी करू शकतो.
* आकाशदर्शन : शहराच्या प्रकाशापासून लांब जाऊन एकदा तरी उघड्या डोळ्यांनी आकाश न्याहाळा.
* अंधश्रद्धा दूर करा : ग्रहांच्या स्थितीचा मानवी नशिबावर परिणाम होतो, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. खगोलशास्त्र तर्कशुद्ध विचार करायला शिकवते.
* विद्यार्थ्यांना प्रोत्साहन : घरातील मुलांना इस्रोच्या मोहिमांविषयी माहिती द्या. भविष्यातील शास्त्रज्ज्ञ आजच्या कुतूहलातूनच घडणार आहेत. ‘स्पेस एज्युकेशन’ हा एक भविष्यातील ‘कीवर्ड’ असणार आहे.
अंधाऱ्या रात्री आकाशाकडे पाहताना आपण या अफाट विश्वाचा किती छोटा भाग आहोत हे जाणवते; पण मानवी बुद्धिमत्तेने करोडो मैल दूर असलेल्या ताऱ्यांचे रहस्य उलगडले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. २०२६ हे वर्ष भारताला ‘स्पेस सुपरपॉवर’ बनवण्याच्या प्रवासात ऐतिहासिक ठरेल. चला तर मग, या नवीन वर्षात खगोल विज्ञानाची कास धरूया आणि या अथांग अवकाशाला अधिक जवळून समजून घेऊया. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा जगभरातील आवाका पण समजावून घेऊया.
(लेखक खगोलविज्ञानाचे प्रसारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

