शब्दाला किंमत नसेल तर आम्ही थांबतो!

शब्दाला किंमत नसेल तर आम्ही थांबतो!

Published on

16785

शब्दाला किंमत नसेल तर आम्ही थांबतो!

भाजप पदाधिकारी; मुणगेतील अपूर्ण रस्ताकामामुळे नाराजी


सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १० ः मुणगे भंडारवाडी घाटीरस्ता ते सडेवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे आश्वासन अपूर्ण राहिल्याने नाराज आहोत, त्यामुळे आम्ही इथेच थांबतोय, अशा शब्दांत भाजप पदाधिकारी प्रकाश राणे, सुनील पारकर, सावी लोके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून खंत व्यक्त केली.
ही पत्रकार परिषद काल (ता. ९) झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, येथील भंडारवाडी घाटीरस्ता ते सडेवाडीपर्यंत जाणारा रस्ता येथील देवी भगवतीच्या यात्रोत्सोवापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करून मिळावा, अशी मागणी सडेवाडीतील ग्रामस्थांनी विधानसभा मतदान प्रचारादरम्यान आमच्याकडे केली होती. त्यानुसार आम्ही ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे रस्त्याचे काम मंजूर झाले. हे काम पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नसलेल्या पोटठेकेदाराने एस्टीमेंट बदलून आपल्या सोयीनुसार भंडारवाडी घाटीपुढच्या भागाचे एस्टीमेंट करून घेतले. त्यामुळे सडेवाडी येथील ग्रामस्थांना आश्वासन देऊनही रस्त्याचे काम करून देता आले नाही. त्यामुळे आमच्या शब्दाला किंमत नसेल तर आम्ही इथेच थांबतो. हिंदळे सडा, मुणगे सडा, भंडारवाडी घाटी रस्ता खडीकरण-डांबरीकरण काम मंजूर झाले असून त्यासाठी पंधरा लाखाचा निधी मंजूर झाला. यामध्ये भंडारवाडी घाटी रस्ता ते सडेवाडी असे स्पष्ट लिहिलेले असताना पोट ठेकेदाराने चुकीची माहिती देऊन चुकीचे एस्टीमेंट तयार केले आहे. अशा प्रकारे पोट ठेकेदाराची ‘लॉबी’ ढवळाढवळ करीत असेल तर आम्हा कार्यकर्त्यांना यापुढे थांबावे लागेल.
याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेण्यासाठी कणकवली येथे गेलो होतो. मात्र्र, त्यांची भेट न झाल्याने त्यांचे स्वीय सहाय्यक यांना भेटून त्यांना चुकीचे एस्टीमेंट बदलून देण्यास सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले, मात्र पोट ठेकेदाराने पालकमंत्र्यांना भेटून चुकीची माहिती देऊन केलेले एस्टीमेंट बदलू नये, असे सांगितले. त्यामुळे मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकलो नाही. पक्षाच्या कोणत्याही प्रक्रियेत नसणाऱ्या माणसाचे ऐकले जात असेल तर आम्हाला इथेच थांबावे लागेल. अशा प्रकारांना आळा बसलाच पाहिजे. घाटीरस्त्याऐवजी अन्य कुठे काम होत असेल तर ते होऊ देणार नाही. याविरोधात २६ जानेवारीला पंचायत समिती कार्यालयासमोर सडेवाडीतील ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचे राणे, पारकर व लोके यांनी सांगितले. यावेळी नारिंग्रे सरपंच महेश राणे, महेश जंगले, सुरेश हिंदळेकर, मनोज जाधव, यशवंत मुरकर, नंदकिशोर राणे व मुणगे पंचायत समिती मतदानसंघातील प्रमुख भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com