​भजनी कलाकारांचा समृद्ध वारसा जपा

​भजनी कलाकारांचा समृद्ध वारसा जपा

Published on

16800


​भजनी कलाकारांचा समृद्ध वारसा जपा

नीतेश राणे ः पालकमंत्री भजन चषक स्पर्धेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १० : कोकणच्या मातीला भजन, वारकरी परंपरा आणि सांस्कृतिक कार्याची समृद्ध अशी मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील इतर कला व कलाकारांना ज्या पद्धतीने शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते, त्याच धर्तीवर कोकणातील भजनी कलाकारांचा वारसा जपण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
कणकवली येथील ‘पालकमंत्री चषक’ तालुकास्तरीय भजन स्पर्धेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. महायुती सरकारचा अजून चार वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून, या कालावधीत भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त कल्याणकारी योजना आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मंत्री राणे म्हणाले, की वारकरी संप्रदाय आणि भजनी कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी भजनी कलाकार संस्था अध्यक्ष संतोष कानडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक विधिमंडळ अधिवेशनात कलाकारांच्या हिताचे प्रश्न मांडून त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. समाजाच्या नेमक्या गरजा ओळखून त्या शासनापर्यंत पोहोचवणारा प्रतिनिधी महत्त्वाचा असतो. सध्या सत्तेत सर्वच क्षेत्रांना न्याय देण्याची भूमिका असलेली माणसे कार्यरत असल्याने विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे रचनात्मक कामांसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत.’
या सोहळ्याला भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, गावंडळकर महाराज, भजनी कलाकार संस्था अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com