-पोलीस दलाचे ‘डिजिटल’ पाऊल

-पोलीस दलाचे ‘डिजिटल’ पाऊल

Published on

चारित्र्य पडताळणीसह सात सेवा ऑनलाइन
रत्नागिरीत २१ हजार ८८५ अर्ज निकाली ; पोलिस दलाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः राज्यशासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखड्याची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागरिकांसाठी सात महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या २४ हजार ५५४ अर्जांपैकी २१ हजार ८८५ निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना पोलिस ठाण्याचे उंबरठे न झिजवता थेट ‘आपले सरकार’ पोर्टलवरून विविध परवाने आणि प्रमाणपत्रे मिळवता येणार आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांना विनाविलंब सेवा देणे हा आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे नागरिकांना पोलिस ठाण्याला फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. अर्जाची सद्यःस्थिती ऑनलाइन पाहता येणार असल्याने प्रक्रियेत सुसूत्रता आली असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
ऑनलाइन सेवा सुरू झाल्यापासून हजारो रत्नागिरीकरांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत चारित्र्य पडताळणीसाठी २४ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २१ हजार ८८५ निकाली काढण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपक परवान्यासाठी ५५९ अर्ज आले होते त्यातील ५४३ जणांना परवाने देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या पीसीसीसाठी प्राप्त झालेले सर्व ११२ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. नागरिकांनी धावपळ टाळण्यासाठी आणि सुलभ कामकाजासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन रत्नागिरी पोलिसदलातर्फे करण्यात आले आहे. या डिजिटल बदलामुळे सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.
------
चौकट
* सात सेवा डिजीटलस्वरुपात
- चारित्र्य पडताळणी : खासगी किंवा निमशासकीय नोकरीसाठी लागणारे प्रमाणपत्र.
- पोलिस अनुमती प्रमाणपत्र : परदेश प्रवासासाठी आवश्यक क्लिअरन्स सर्टिफिकेट.
- ध्वनिक्षेपक परवाना: लाऊडस्पीकर वापरासाठीची रीतसर परवानगी.
- मनोरंजन कार्यक्रम नाहरकत: सांस्कृतिक किंवा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी एनओसी.
- शोभायात्रा व मिरवणूक: सण-उत्सवांमधील मिरवणुकीसाठी ऑनलाइन अर्ज.
- सभा व संमेलन: सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी लागणारी परवानगी.
- हत्यार परवाना: नवीन परवाना मिळवणे किंवा नूतनीकरण प्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com