4 दिवसांच्या परिश्रमानंतर एमआयडीसीचे पाणी पूर्ववत

4 दिवसांच्या परिश्रमानंतर एमआयडीसीचे पाणी पूर्ववत

Published on

-rat१०p२४.jpg-
P२६O१६८१८
रत्नागिरी : टेंब्येपूल येथे पाईपलाईन दुरूस्तीचे सुरू असलेले काम.
---
एमआयडीसीचे पाणी अखेर पूर्ववत
मुख्य जलवाहिनी टेंब्येपूल येथे फुटली; कर्मचाऱ्यांची मेहनत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः हरचिरी येथून एमआयडीसी आणि मिऱ्या-शिरगावसह काही गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी टेंब्येपूल येथे फुटल्याने तीन ते चार दिवस या परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र ठेकेदार, एमआयडीसीचे कर्मचारी यांनी अहोरात्र काम करत फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती करण्यात यश मिळवले. पाण्याच्या दाबाने वारंवार जलवाहिनी फुटू नये यासाठी काँक्रीटही टाकून ती मजबूत करण्यात आली. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत झाला.
हरचिरी धरणातून एमआयडीसीसह मिऱ्या व शिरगाव, नाचणेसह अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो. मागील पाच-सहा दिवसांपासून टेंब्येपूल येथे ही जलवाहिनी पाण्याच्या दबावामुळे वारंवार फुटत होती. नदी क्रॉसिंगजवळ फुटल्याने भरती-ओहोटीच्या वेळा पाहून ती दुरुस्त करावी लागत होती; मात्र ठेकेदाराने उपअभियंता बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस दिवस-रात्र काम करून जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावला. नदीकिनारी फुटलेल्या ठिकाणी जीआय पाईपचा तुकडा काढून टाकून नवीन पॅच बसवला. तर टेंब्येपूलच्या उतारामध्ये फुटलेल्या ठिकाणी पाईपलाईन दुरूस्ती करून, काँक्रिटने ती पॅकबंद करण्यात आली. त्यामुळे पाण्याच्या दबावाने पाईप फुटण्यास प्रतिबंध होणार आहे. शुक्रवारी चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ठेकेदार कंपनी व एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावत पाणी सुरू केले. त्यामुळे एमआयडीसीतील उद्योजकांसह मिऱ्या, शिरगाव, नाचणे भागातील ग्रामस्थांनी बी. एन. पाटील व या ठिकाणी काम करणाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com