रत्नागिरी- तिहेरी दुचाकी अपघातात कोल्हापुरचा तरुण ठार

रत्नागिरी- तिहेरी दुचाकी अपघातात कोल्हापुरचा तरुण ठार

Published on

-rat10p26.jpg
16824
रत्नागिरी ः मिऱ्या रोड येथे झालेल्या अपघातामधील दुचाकी.

तिहेरी दुचाकी अपघातात
कोल्हापूरचा तरुण ठार

मिऱ्या रोड येथे अपघात; महिलेसह चौघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः शहराजवळील भाटीमिऱ्या (मिऱ्या रोड) येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तिहेरी दुचाकी अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुण जागीच ठार झाला; तर एका महिलेसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिऱ्याबंदर ते रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर सुप्रिया सचिन बडवे (रा. रत्नागिरी) या दुचाकीवरून (एमएच ०८, बीजी ६६६९) निघाल्या होत्या. त्यांच्या मागून मोटारसायकल (एमएच ०९, इएच १९८३) येत होती. दरम्यान, रत्नागिरीकडून सडामिऱ्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलवरील (एमएच ०८, बीएच ८४४५) चालकाने भाटीमिऱ्या एसटी बसस्थानकाजवळ विरुद्ध दिशेने येत समोरून येणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात संस्कार सरदार कांडर (वय २०, रा. पन्हाळा, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला, तर दिग्विजय विजय पाटील, सुप्रिया बडवे, अथर्व संजय भोईर आणि केशव राजबहादूर कुशावत हे गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी एका तरुणाचा दातांसह जबडा बाहेर आल्याने अपघाताची तीव्रता अधिकच भयावह होती. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघाताचा पुढील तपास मिरकरवाडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोलिस हेडकॉन्स्टेबल शिवलकर करत आहेत.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील चार तरुण दोन दुचाकींवरून मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. मालवणहून येऊन रत्नागिरीत मिऱ्याबंदर परिसरात फिरून पुन्हा शहराकडे येत असताना हा अपघात घडल्याचे पुढे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com