लोकमान्य वाचनालय येथे ११ ला वक्तृत्व स्पर्धा

लोकमान्य वाचनालय येथे ११ ला वक्तृत्व स्पर्धा

Published on

डॉ. सागर शिर्के यांना
डॉक्टरेट पदवी प्राप्त
चिपळूण : शहरातील माळक (मालक) येथील डॉ. सागर शिर्के यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल शहरातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. शिर्के यांचे अभिनंदन करताना डॉ. गोविंद जोशी, प्रसन्ना बापट, निशा सकपाळ, अर्जुन साळवी, पवन राठोड यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच एचडीएफसी बँकेच्या वतीने सागर जागुष्टे, आदित्य गांधी, संकेत शिंदे, सुशील सोनकांबळे, जितेंद्र बामणे, संदीप कदम, शशांक दामले व विकास कदम यांनीही डॉ. शिर्के यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

-----
कोवळे यांच्याकडे
प्रचाराची जबाबदारी
चिपळूण : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ साठी युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, या निवडणुकीत शिवसेना पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेना पक्षाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. गायत्री हर्षवर्धन पवार यांच्या प्रचाराचे नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी निहार कोवळे यांच्याकडे देण्यात आली आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निहार कोवळे जायंट किलर ठरले होते. अनुभवी शैलेश टाकळे यांच्यावर मात करीत त्यांनी या निवडणुकीत विजयी मिळविला आहे. युवासेनेतील त्यांचा सक्रिय सहभाग, संघटन कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांची निवड केल्याचे समजते.

-------------

भरणे वसतिगृहाला
साहित्य वाटप

खेड ः भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या र. बा. जाधव वसतिगृहाला लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यासाठी निकेत काणेकर यांचे सहकार्य लाभले. भरणे येथील नवभारत वसतिगृहात अनेक गरजू विद्यार्थी वास्तव्यास आहेत. बेताच्या परिस्थितीवर मात करत ते नवभारत हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना कोणतीही कमतरता भासू नये, याकडे लायन्स क्लब ऑफ सिटीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नववर्षाचे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुपूर्द केला. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, निकेत काणेकर, गोरिवले आदी उपस्थित होते.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com