''फार्मसी'' विद्यार्थ्यांच्या कलागुणांची चुणूक
swt12१३.jpg
तोंडवलीः येथे त्विषा २.० कोकण रिजन अंतर्गत कॅरम व बुध्दिबळ स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
‘फार्मसी’ विद्यार्थ्यांच्या कलागुणांची चुणूक
''त्विषा २.०'' ः तोंडवलीत कॅरम, बुध्दिबळ स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १२ ः तोंडवली येथे एपीटीआय संचलित ''त्विषा २.० कोकण रिजन'' अंतर्गत श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेसाठी कोकण विभागातील फार्मसी महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. खाडे, तोंडवली फार्मसी कॉलेजचे प्र. प्राचार्या रोहणी विचारे, सचिन राणे, कोकण विभागातील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण यांनी कॅरम व बुध्दिबळ स्पर्धांचे महत्त्व विशद करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता व सांघिक भावना विकसित होते, असे मत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल असा ः कॅरम मुलगे (डबल)-रोहन पवार, ओम पार्टे (फार्मसी कॉलेज तोंडवली), यश मोरे, कैवल्य राऊत (फार्मसी कॉलेज, साडवली). मुलगे (सिंगल)-रोशन गामरे (फार्मसी कॉलेज तोंडवली), करण राठोड (फार्मसी कॉलेज डिगस). कॅरम मुली (डबल)-साक्षी जाधव, आर्या निमाणकर (फार्मसी कॉलेज सावर्डे), मानसी भंडारे, सिद्धी पांढरे (फार्मसी कॉलेज, डिगस). मुली (सिंगल)-अफिया काझी (तोंडवली फार्मसी कॉलेज), अलिशा सावंत (फार्मसी कॉलेज डिगस). बुध्दिबळ मुले-प्रफुल्ल सावंत (फार्मसी कॉलेज डिगस), प्रथमेश गवाणकर (फार्मसी कॉलेज शिरवल). बुध्दिबळ स्पर्धा मुली-सायली (फार्मसी कॉलेज डिगस), मानसी पवार (फार्मसी कॉलेज तोंडवली). सर्व विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत यानी अभिनंदन केले.

