शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कृतचा संस्कार करावा

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कृतचा संस्कार करावा

Published on

rat12p6.jpg-
P26O17108
रत्नागिरी : संस्कृत कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. संभाजी पाटील. सोबत चिन्मय आमशेकर, डॉ. दिनकर मराठे, डॉ. कार्तिक राव आणि स्मिता सरदेसाई.

विद्यार्थ्यांवर संस्कृतचा संस्कार करा
प्रा. संभाजी पाटीलः कार्यशाळेत प्रमाणपत्राचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : माध्यमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या संस्कृत शिक्षकांनी योग्य, सुटसुटीत आणि सोप्या संस्कृतचा उपयोग करावा आणि नियमित सरावाने संस्कृत भाषेला आत्मसात करावे. विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांनी संस्कृतचा संस्कार करावा, असे प्रतिपादन पुणे येथील डेक्कन अभिमत विद्यापीठ भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्कृत विश्वकोष केंद्रातील प्रा. संभाजी पाटील यांनी केले.
संस्कृत कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय (नवी दिल्ली), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत शिक्षक मंडळाच्या सहयोगाने संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यशाळेत महाबल भट्ट, के. जी. महेश, प्रा. संभाजी पाटील, डॉ. राजेंद्र सावंत, आशिष आठवले, डॉ. गोपीकृष्ण रघू आणि चिन्मय आमशेकर यांनी मार्गदर्शन केले. समारोपावेळी शिक्षकांनी अनुभवकथन केले. सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com