राज्यस्तरीय काव्यसंग्रहात भारती राजवाडेंच्या कविता
गोगटे महाविद्यालयात उद्या
बावडेकर स्मृती व्याख्यान
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य, माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. व्ही. के. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ४० व्या विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन १४ जानेवारीला सकाळी १० वा. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे केले आहे. यात ज्येष्ठ कीटकतज्ज्ञ व मित्रकीडा बायोसोल्युशन्स आणि मित्रकीडा फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक डॉ. राहुल मराठे व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेसाठी सर्व विज्ञान तसेच निसर्गप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
----------
अवंतिका हट्टीहोली
जिल्ह्यात द्वितीय
पाली ः यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या रत्नागिरी जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झाल्या. या स्पर्धेसाठी पाली विद्यामंदिरची अष्टपैलू खेळाडू अवंतिका हट्टीहोली हिने मुलींच्या मोठ्या गटात थाळीफेक स्पर्धेमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. या अगोदरही गतवर्षी थाळीफेक स्पर्धेमध्ये ती लहान गटातून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाने विजयी झालेली होती. या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक शिक्षक मारूती घोरपडे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते, उपशिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, श्रुती वारंग या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, विद्यार्थी सुरक्षा समितीचे अॅड. सागर पाखरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
-------
rat12p29.jpg-
O17148
भारती राजवाडे
राज्यस्तरीय काव्यसंग्रहात
भारती राजवाडेंच्या कविता
साडवली ः सीता ट्रस्ट आहिल्या नगर, समर्थ फाउंडेशन पुणे आणि जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत नुकताच ‘आई’ हा काव्य महोत्सव साहित्य पुरस्कार सोहळा पुणे येथे झाला. मातृत्वाच्या भावनेला शब्दरूप देणाऱ्या ‘आई’ या राज्यस्तरीय काव्यसंग्रहाने अभूतपूर्व यश संपादन केले असून, या ग्रंथाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या ग्रंथांमध्ये समाविष्ट असणाऱ्या राज्यभरातील सर्व साहित्यकांची जागतिक ग्रंथांमध्ये नोंद होणे ही सर्व साहित्यकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. देवरूख येथील कवयित्री भारती राजवाडे यांच्या साहित्य कवितांची जागतिक ग्रंथामध्ये नोंद झाली असून, लवकरच प्रमाणपत्र त्यांना देण्यात येणार आहे. ‘आई’ या राज्यस्तरीय काव्यसंग्रहाची वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंद ही मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरली असून, मातृभावनेला अर्पण केलेला हा ग्रंथ पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
-------
नाणीज विद्यालयात
प्रथमपचार शिबिर
साखरपा ः नाणीज माध्यमिक विद्यामंदिरमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार आणि सीपीआर शिबिर घेण्यात आले. पुणे येथील श्वास संस्थेच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला संस्था अध्यक्ष प्रशांत कदम, सचिव सुधीर कांबळे, श्वासच्या संस्थापक अध्यक्षा रूची सेठी, मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होता. सेठी यांनी प्रथमोपचार आणि सीपीआर यांची माहिती प्रात्यक्षिक रूपात दिली. यामध्ये आपत्कालीन रक्तस्त्राव, गुदमरल्यासारखे आजार, बेशुद्धीचे झटके, भाजणे, फ्रॅक्चर, मोच, आपत्कालीन विषबाधा आदी परिस्थितीमध्ये प्राथमिक स्वरूपात कोणती खबरदारी घ्यावी यांचे प्रशिक्षण उपस्थितांना दिले. या सोबतच सीपीआर म्हणजे काय0 हार्टअटॅक व सीपीआरमधील फरक, अशा प्रसंगी कोणती सावधानता बाळगावी, गरजू व्यक्तीला कसे हाताळावे इत्यादीची तपशीलवार माहिती देऊन सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून याचे प्रात्यक्षिक देखील करवून घेतले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

