रत्नागिरी १०० टक्के निकालाची परंपरा कायम

रत्नागिरी १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Published on

-rat१२p२१.jpg ः
P२६O१७१४०
अन्विक्षा भेलेकर
-rat१२p२२.jpg
२६O१७१४१
ःजान्हवी भुवड
-rat१२p२३.jpg ः
P२६O१७१४२
तीर्था सागवेकर
-rat१२p२४.jpg ः
P२६O१७१४३
अस्मी कानसे
-rat१२p३४.jpg :
P२६O१७१८२
ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत यश मिळवणारे फाटक हायस्कूलचे विद्यार्थी. मागे बसलेले शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी.
----------
जान्हवी, अस्मी, तीर्था, अन्विक्षा राज्य गुणवत्ता यादीत
चित्रकला परीक्षा; फाटक हायस्कूलने जपली १०० टक्के निकालाची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये फाटक हायस्कूलच्या चौघा विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत आणि एकूण सहा पारितोषिके पटकावली. दोन्ही परीक्षांचा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला.
इंटरमिजिएट परीक्षेत जान्हवी भुवड हिने राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक मिळवला. तिला भूमिती आणि अक्षरलेखन विषयात पारितोषिक प्राप्त झाले. अस्मी कानसे राज्यात ७१वी आणि तीर्था सागवेकर राज्यात ८२वी अशा तीन विद्यार्थिनींनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. एलिमेंटरी परीक्षेत अन्विक्षा भेलेकर ही राज्य गुणवत्ता यादीमध्ये ५३वी आली. तिला ऑब्जेक्ट ड्रॉईंग विषयामध्ये पारितोषिक प्राप्त झाले.
दोन्ही परीक्षांना बसलेल्या ६९ पैकी ६२ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे. इंटरमिजिएट परीक्षेला ३४ विद्यार्थी बसले होते. हा निकाल शंभर टक्के लागला. यातील ३१ विद्यार्थ्यांना अ श्रेणी मिळाली. एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेले ३५ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये ३१ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दिलीप भातडे व नीलेश पावसकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये व संस्थेचे पदाधिकारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यशाबद्दल संस्था सचिव आणि चित्रकला शिक्षक दिलीप भातडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी केलेला सातत्यपूर्ण सराव, पालकांचे सहकार्य, अचूक मार्गदर्शनामुळे उज्ज्वल यश प्राप्त होऊ शकले.
----------
कोट
सफर रंगांची उपक्रम या द्वारे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन निसर्गसौंदर्याचा अभ्यास, चित्र रेखाटन, रंगछटांचा अभ्यास केला जातो. विद्यार्थ्यांचा कलात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि विद्यार्थी कलेशी एकरूप व्हावेत, यातून हा उपक्रम सुरू केला. त्याचा फायदा चित्रकला स्पर्धेसाठी झाला.

---नीलेश पावसकर, कलाशिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com