-टाचदुखीवरील उपाय मानदुखीवर काम करतो

-टाचदुखीवरील उपाय मानदुखीवर काम करतो

Published on

फिजिओ संवाद ..........लोगो
(५ जानेवारी टुडे ३)

टाचदुखीवरील उपाय
मानदुखीवर काम करतो

वेदना शारीरिक असो वा मानसिक तिचे मूळ लवकरात लवकर शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे. यामध्ये फिजिओथेरपी योग्य वेळी करणे अत्यंत उपयुक्त ठरते. फिजिओथेरपिस्ट तुम्हाला तुमच्या दुखण्याचे मूळ शोधायला मदत करतात आणि त्यावर शाश्वत आणि प्रभावी उपाय केला जाऊ शकतो याची काळजी घेतात. त्यामध्ये स्ट्रेचिंग (स्नायू ताणून सैल करणे), स्नायूंची ताकद वाढवण्याचे तसेच श्वसनाचे व्यायाम, विविध रिलॅक्सेशन तंत्रे, इलेक्ट्रोथेरपी, जीवनशैलीतील बदल (लाइफस्टाइल मॉडिफिकेशन), काम करण्याच्या पद्धतीतील बदल (अर्गोनॉमिक्स) या सर्व गोष्टींबद्दल माहिती देऊन आणि उपचार करून फिजिओथेरपिस्ट तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो.
- rat१३p५.jpg-
P26O17394
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT)B.P.Th.
------
वेदनेचे मूळ शोधतांना, वेदना शारीरिक आहे की मानसिक आहे हे शोधणं गरजेचं असतं. वेदना कधी कधी शारीरिक, मानसिक असते तर कधी या दोघांचा एकत्रित परिणाम असते. मुळात कुठल्याही वेदनेचे मूळ शोधताना ‘होलिस्टिक अॅप्रोच’ म्हणजेच ‘समग्र दृष्टिकोन’ महत्त्वाचा असतो म्हणजेच कुठल्याही दुखण्याकडे बघताना केवळ त्याच अवयवाचा विचार न करता पूर्ण शरीराचा त्या अवयवासंबंधी विचार करणं गरजेचं आहे. आपले शरीर एक अखंड संस्था म्हणून काम करते. त्याचा कुठलाही भाग हा स्वायत्तपणे काम करत नाही.
जसं की, एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखी असेल तर ती फक्त त्याच गुडघ्याशी संबंधित असेल असे नाही. कधी कधी एका गुडघ्याच्या रचनेमध्ये झालेला बदल हा दुसऱ्या गुडघ्याच्या दुखापतीचे कारण बनतो. एक गुडघा जर कमकुवत झाला असेल तर त्याची भरपाई करण्याची जबाबदारी दुसऱ्या गुडघ्यावर येते. घरामध्ये चार व्यक्ती आहेत आणि त्यापैकी दोन व्यक्ती काम करत नसतील तर उरलेल्या दोन व्यक्तींवर ज्याप्रमाणे सर्व कामांचा भार येतो तसेच अवयवांच्या बाबतीत घडते आणि एका गुडघ्याचा भार दुसऱ्या गुडघ्याने घेतल्यामुळे पर्यायाने दोन्ही गुडघे दुखू लागतात. एकाच गुडघ्याने पायरी चढणे किंवा उतरणे कारण दुसऱ्या गुडघ्याने चढताना किंवा उतरताना त्रास होतो. असे केल्यामुळे दोन्ही गुडघ्यांचा समतोल जाऊन दोन्ही गुडघे हळूहळू निकामी होण्याकडे वाटचाल करतात.
एक रुग्ण मानदुखीची तक्रार घेऊन आले होते आणि दुखण्याचे मूळ शोधता शोधता टाचदुखीपर्यंत जाऊन शोध थांबला. टाचदुखीमुळे पोटरीचे स्नायू आखडतात, त्याचा प्रत्यय म्हणून गुडघ्यांचा समतोल बिघडतो आणि त्याचा प्रत्यय हळूहळू कमरेकडे आणि तिथून मणक्यांमधून मानेपर्यंत हा समतोल बिघडत जातो. परिणामी, मान दुखू लागते मग अशावेळी टाचदुखीवर केलेला उपाय मानदुखीवर काम करतो.
आणखी एक उदाहरण म्हणजे पायाच्या कमजोरीमुळे येणारी कंबरदुखी आणि कंबरदुखीमुळे येणारी पायदुखी. जर पायाच्या स्नायूंची ताकद कमी झालेली असेल तर कोणत्याही हालचालीचा अतिरिक्त भार कमरेवर येतो. परिणामी, कंबरदुखी सुरू होते किंवा जर कमरेचे स्नायू कमकुवत झाले असतील तर त्याचा परिणाम म्हणून पाय दुखू लागतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून या सगळ्या दुखण्याचा उपाय केला जाऊ शकतो; पण वेदनेचं मूळ शोधणे हीच केव्हाही उपाय करण्याची पहिली पायरी आहे.
आता जसं शारीरिक तसं मानसिक मूळ शोधणंदेखील तितकेच गरजेचं असतं. खूपवेळा शरीरातील ताणतणाव, चिंता, अस्वस्थता या सगळ्याचा प्रभाव शरीरावर दिसून येतो. मानसिक स्वास्थ्य जर नीट नसेल तर हळूहळू शरीरतणाव साठवायला सुरुवात करू लागतं. शरीरामध्ये तणाव साठवण्याच्या काही जागा असतात उदाहरणार्थ, स्नायू, चरबी, डोळे, सांधे अशा ठिकाणी त्या साठवलेल्या तणावाचे परिणाम दिसू लागतात. श्वास उथळ होतो (शॅलो ब्रीदिंग), खांदे वर खेचले जातात, डोळे जड आणि खोल होऊ लागतात, वजन वाढू लागते, स्नायू कायम आखडलेले राहू लागतात. परिणामी, स्नायूंमुळे येणारी सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी सुरू होते. रक्तवाहिन्यांमधील दाब बदलून रक्तप्रवाह बिघडतो आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम तर सर्वांना ठाऊकच आहेत. म्हणूनच शारीरिक असो वा मानसिक; वेदनेचे मूळ लवकरात लवकर शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे. यामध्ये फिजिओथेरपी योग्यवेळी करणे अत्यंत उपयुक्त ठरते. फिजिओथेरपिस्ट तुम्हाला तुमच्या दुखण्याचे मूळ शोधायला मदत करतात आणि त्यावर शाश्वत आणि प्रभावी उपाय केला जाऊ शकतो याची काळजी घेतात.

(लेखक लांजा येथे अनादी फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com