कुडाळमध्ये २५ ला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’
17426
कुडाळमध्ये २५ ला ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’
राज्यस्तरीय सायकल स्पर्धा; ‘सायकलिस्ट’, ‘रेनबो’चा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग व रेनबो रायडर्स ओरोस यांच्या सहकार्याने ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ या सायकल स्पर्धेचे आठवे संस्करण २५ जानेवारीला येथील बॅ. नाथ पै मैदान, एमआयडीसी येथे आयोजित केले आहे. ही स्पर्धा २५ कि.मी. फन राईड व ६० कि.मी. एलिट रेस अशी दोन प्रमुख विभागात होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अमोल शिंदे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, प्रमोद भोगटे, सचिन मदने, डॉ. बापू परब, प्रथमेश सावंत, सिद्धाली परब आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी राहण्याची तसेच फन राईड करणाऱ्या मुलांसाठी विशेष सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे. साठ कि.मी. एलिट रेससाठी सर्वसाधारण विजेता २५ हजार, पुरुष गटात १४ ते ४० वर्षे ओपन तसेच ४० वर्षांवरील मास्टर्स, तर महिला गटासाठी ओपन अशी एलिट रेसची विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक गटात प्रथम क्रमांक रू १५ हजार व चषक, द्वितीय १० हजार व चषक, तृतीय ७ हजार व चषक, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांसाठी हेल्मेट बंधनकारक असून मार्गावर स्वयंसेवकांच्या मदतीने मुलांसह सर्व सायकलपटूंच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्याबाहेरून व राज्याबाहेरून येणाऱ्या सायकलपटूंसाठी कुडाळ शहरात राहण्याची व आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे. हा उपक्रम सायकलिस्ट असोसिएशनतर्फे स्थानिक सामाजिक संस्था व वैद्यकीय सेवकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. इच्छुक सायकलपटूंनी कुडाळ येथे शिवएंटरप्रायजेस, इन्स्पायर सायकल, परब हॉस्पिटल सुकळवाड, कनिष्क झेरॉक्स ओरोस झांटये मेडिकल जनाई मेडिकल कणकवली, डॉ. साईनाथ पित्रे (सावंतवाडी), शिवदत्त सावंत (वेंगुर्ले), रामचंद्र चव्हाण (मालवण), संकेत नाईक (दोडामार्ग), एम. पी. सायकल (देवगड), जयदीप पडवळ (शिरोडा), संतोष टक्के (वैभववाडी) येथे नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

