: मुंडे महाविद्यालयात जनजागृती
Rat१३p७.jpg-
P२६O१७४०४
मंडणगड : पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांचे स्वागत करताना उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये.
---
पोलिस स्थापना दिनानिमित्त
मुंडे महाविद्यालयात जनजागृती
मंडणगड, ता. १३ ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय येथे पोलिस स्थापना दिनानिमित्त जनजागृती मोहिमेअंतर्गत शस्त्र माहिती व प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयात मंडणगड पोलिस ठाणे, महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस रेजिंग डे सप्ताहांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मंडणगड पोलिस ठाण्याचे तेजस मोरे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, विनय पाटील, वैशाली चव्हाण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. मुकेश कदम आदी उपस्थित होते. या वेळी मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलिस विभागाची रचना, शिस्तबद्ध कार्यपद्धती, कायद्याचे महत्त्व तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

