टॉवर सुरु न झाल्यास २६ रोजी उपोषण करू

टॉवर सुरु न झाल्यास २६ रोजी उपोषण करू

Published on

-rat१३p२४.jpg
P26O17458
साखरपा : बंद अवस्थेतील ओझरेबुद्रुक येथील बीएसएनएलचा टॉवर.
----------
टॉवर सुरू न झाल्यास २६ला उपोषण
ओझरेबुद्रुक ग्रामस्थ आक्रमक; काम पूर्ण होऊन दोन वर्षे
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १३ : ओझरेब्रुद्रुक (ता. संगमेश्वर) गावातील मोबाईल टॉवर गेले काही महिने बंद आहे. हा टॉवर सुरू न झाल्यास संतप्त तीन गावच्या ग्रामस्थांनी २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील ओझरे ब्रुद्रुक आणि निनावे सीमेलगत उभा केलेला बीएसएनएल टॉवर केवळ शोभेचा ठरत आहे. गेली दोन वर्षे टॉवरचे काम पूर्ण झाले; मात्र त्यावर लाल बावटा व पायथ्याशी मोठी लाईट दिवसरात्र चालू आहे. या पलीकडे काहीच सुधारणा झालेली नाही. २६ जानेवारीपूर्वी टॉवर सुरू न झाल्यास देवरूख तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा त्यामुळे ओझरे बुद्रुक, निनावे व खडीकोळवण ग्रामस्थांनी दिला आहे.
समन्वय समिती मुंबई यांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी टॉवर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल बीएसएनएल कार्यालयाने घेऊन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले; मात्र हे आश्वासन पोकळ ठरले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
-------
चौकट
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
महिन्याभारत दहावी, बारावी परीक्षा सुरू होत असून, ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावात फक्त दिवसातून एसटीच्या तीन फेऱ्या, रस्ते आणि पाणी याच काय त्या सुविधा. गावात आपत्कालीन समस्या ओढवली तर प्रशासनाशी संपर्क कसा करायचा, गावात आजारी माणूस पडले तर डॉक्टरांशी संपर्क कसा करायचा, ग्रामस्थांना मुंबई-पुणे व अन्य शहरात असणाऱ्या कुटुंबाशी संपर्क कसा करायचा, अशा एक ना अनेक समस्या भेडसावत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com