शिवारआंबेरेत रक्तदान शिबिर
शिवारआंबेरेत
रक्तदान शिबिर
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जगद्गुरू महाराज संस्थेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. उद्घाटन सरपंच राजन रोकडे यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी हिंदरत्न प्रकाश बाबू पाटील ब्लड बँक सांगली यांनी मौलिक योगदान दिले. शिबिर यशस्वी होण्यासाठी संतोष कुरतडकर यांनी विशेष योगदान दिले.
भरत नाटेकरांचा
कृतज्ञता सन्मान
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील श्रीदेव महापुरुष भजन मंडळ व गावडेआंबेरे येथील मैत्री ग्रुपतर्फे खारवी समाजभवन येथे भरत नाटेकर यांचा सपत्निक कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात झाला. मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, उदय बने, समाजसेवक रंगकर्मी श्रीराम सारंग, खारवी समाज पतसंस्था उपाध्यक्ष सुधीर वासावे, मैत्रीग्रुपचे अध्यक्ष गोपाळ हरचकर आदी उपस्थित होते.

