रॉक क्लाइंबिंग स्पर्धेत रत्नागिरीचे गिर्यारोहक चमकले
- rat१३p२५.jpg-
२६O१७४६८
रत्नागिरी ः डावीकडून प्रसाद शिगवण, सृजन पटवर्धन आदी.
-----
रत्नागिरीच्या गिर्यारोहकांचे राष्ट्रीय यश
‘पचमढी क्लायबिंग चॅलेंज स्पर्धा’ ; सृजन तिसरा, प्रसाद सहावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः मध्यप्रदेशातील पचमढी येथे झालेल्या ‘पचमढी क्लायबिंग चॅलेंज २.०’ स्पर्धेत सृजन पटवर्धनने तिसरा आणि प्रसाद शिगवण याने ६वा क्रमांक पटकावत रत्नागिरीच्या साहसी क्रीडाक्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली आहे. देशातील नामांकित राष्ट्रीय रॉक क्लायबिंग स्पर्धेत ताकद, कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर दोन्ही गिर्यारोहकांनी यश मिळवले आहे.
इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन पश्चिम विभागीय कमिटी यांच्या आधिपत्याखाली ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत पचमढी क्लायबिंग चॅलेंज २.० ही भारतीय (ओपन) राष्ट्रीय रॉक क्लायबिंग स्पर्धा मध्यप्रदेशातील निसर्गरम्य पचमढी येथे जटाशंकर रॉक फेस या नैसर्गिक खडकावर पार पडली. देशभरातील साहसी खेळाडूंना एकत्र आणणारी ही स्पर्धा भारतीय रॉक क्लायबिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत सहभागी गिर्यारोहकांची शारीरिक ताकद, मानसिक स्थैर्य आणि तांत्रिक अचूकता यांची खरी कसोटी लागते. १७ वर्षांवरील पुरुष व महिला तसेच १७ वर्षांखालील मुला–मुलींच्या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाने उंची, थकवा आणि दडपणावर मात करत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिद्दी माउंटेनिअरिंग या संस्थेच्या माध्यमातून सहभागी झालेले सृजन पटवर्धन आणि प्रसाद शिगवण हे दोन तरुण गिर्यारोहक विशेष लक्षवेधी ठरले.
या स्पर्धेत सृजन पटवर्धन यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, मार्ग वाचनाची क्षमता, वेगवान निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण चढाईच्या जोरावर १७ वर्षांखालील गटात तृतीय क्रमांक पटकावला. प्रसाद शिगवण यांनी अत्यंत कठीण मार्गावर संयम, चिकाटी आणि स्थिर मनोवृत्ती राखत १७ वर्षांवरील गटात ६वा क्रमांक मिळवा.
------
कोट
योग्य प्रशिक्षण, सातत्य, कठोर सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरही कोकणाचा आणि महाराष्ट्राचा झेंडा नक्कीच फडकावता येईल, असा विश्वास या स्पर्धेने अधिक दृढ केला आहे.
- अरविंद नवेले, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

