धनशक्तीला ''जनशक्ती''ने उत्तर द्या
swt147.jpg
17691
दोडामार्ग ः शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख संजू परब. सोबत अन्य.
धनशक्तीला ‘जनशक्ती’ने उत्तर द्या
संजू परबः दोडामार्गात शिवसेनेतर्फे विभागनिहाय आढावा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १४ : तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासकामांबाबत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून पुढील वर्षाच्या नियोजनातून आवश्यक कामे मंजूर करून घेण्यात येतील. संघटना अधिक मजबूत कशी करता येईल, याकडे प्राधान्याने लक्ष द्या. धनशक्तीपुढे जनशक्ती उभारून जशास तसे उत्तर द्या, अशा सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी शिवसैनिकांना दिल्या.
तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने विभागवार बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा प्रमुख परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीनिहाय आढावा घेण्यात आला.
बैठकीत संबंधित भागातील गावनिहाय शाखा प्रमुख, बूथ प्रमुख व सरपंच यांच्याकडून मतदारनिहाय माहिती घेण्यात आली. तसेच इच्छुक उमेदवार कोणकोण आहेत, याची माहिती जाणून घेण्यात आली. प्रत्येक गावातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून पुढील वर्षाच्या नियोजनातून आवश्यक कामे मंजूर करून घेण्याबाबत विचारविनिमय झाला. काही कामे बजेटअंतर्गत असल्याने ती आगामी बजेटमध्ये समाविष्ट करून आमदार केसरकर यांच्यामार्फत मंजूर करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. परब यांनी, संघटना म्हणून आपण कुठे कमी पडतो, त्या त्रुटी कशा भरून काढता येतील, याचे मार्गदर्शन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समिती सदस्य राजेंद्र निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, उपजिल्हाप्रमुख प्रेमानंद देसाई, विधानसभा निरीक्षक नीता सावंत, तालुका संघटक गोपाळ गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, विलास सावंत, दादा देसाई, रामदास मेस्त्री, विठोबा पालयेकर, अनिल शेटकर, विनायक शेट्ये, पूजा देसाई, बाळा नाईक, बबलू पांगम, संजय गवस, गुरू सावंत, भगवान गवस, राजन गवस, लाडू आयनोडकर, मायकल लोबो, मनीषा गवस, सत्यवान धर्णे, नंदू टोपले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

