राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत देवळेकर भगिनी चमकल्या
rat१४p७.jpg-
P२६O१७६८२
रत्नागिरी ः जिल्ह्यात भारतीय प्रख्यात नेमबाज होण्याचा पहिला बहुमान मिळवणाऱ्या कार्तिकी व वरा देवळेकर भगिनी.
नेमबाजीत देवळेकर भगिनी चमकल्या
दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धा; प्रख्यात नेमबाजीचा बहुमान पटकावला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत कार्तिकी मानस देवळेकर व वरा मानस देवळेकर या बहिणींनी अचूक नेमबाजीच्या जोरावर भारतीय प्रख्यात नेमबाज हा मानाचा किताब पटकावला आहे. शॉटगन क्ले पिजन डबल ट्रॅप युथ वूमन श्रेणीमध्ये हा किताब मिळवणाऱ्या त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.
राष्ट्रीय स्तरावर अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या शॉटगन प्रकारात आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत त्यांनी ही कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील या आधी कोणत्याही महिला खेळाडूने या श्रेणीत असा बहुमान मिळवला नव्हता त्यामुळे या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच रायफल या खेळाचे ११ डिसेंबर ते ३ जानेवारीला ६८व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा भोपाळ, मध्यप्रदेश येथे झाल्या. त्यामध्ये ५० मीटर रायफल प्रोन युथ वूमन या खेळ प्रकारातदेखील भारतीय प्रख्यात नेमबाज हा किताब पटकावला. वराने ५९४.२ गुण व कार्तिकीने ५९९ गुण प्राप्त करत २०२६ भारतीय संघ निवड चाचण्यांसाठी आपले स्थान निश्चित केले. या दोघींच्या या यशामागे प्रशिक्षक मोहनीश हिरवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच केसरी भाटी व जितेंद्र चौहान यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळाले. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे ध्येय या दोन्ही खेळाडूंनी व्यक्त केले आहे. कार्तिकी व वरा या रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण घेत असून, त्या सिद्धांत रायफल क्लबच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव प्रशिक्षक राष्ट्रीय प्रख्यात नेमबाज किशन खारके व नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

