पवार पक्षाला कदम यांचा रामराम

पवार पक्षाला कदम यांचा रामराम

Published on

-ratchl१४२.jpg-
२६O१७७५८
रमेश कदम
-----
राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदमांचा राजीनामा
पक्षालाही रामराम; अडचणीच्या काळात पक्षाची साथ नाही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. अडचणीच्या काळात पक्षासाठी योगदान देऊनही एकाकी पाडण्यात आले. पक्षाकडून जिल्हाध्यक्षपद देण्याचे आश्वासनदेखील पाळले गेले नाही. एकूणच प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाला आपली गरज राहिली दिसत नसल्याचे कारण देत माजी आमदार रमेश कदम यांनी प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
माजी आमदार कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. १९८४ पासून शरदचंद्र पवार यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, त्यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होतो. विधानसभा मतदार संघात तळागाळात काम करून पक्ष संघटना मजबूत केल्याने २००४ ला विधानसभा निवडणुकीत विजयी झालो. त्या अगोदर ३५ वर्षे नगरसेवक व साडेनऊ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम करताना तालुक्यात पक्ष संघटना मजबूत केली. मंडणगडपासून राजापूरपर्यंत पक्षाचे अनेक कार्यकर्ते निर्माण केले. पक्षाच्या आदेशाप्रमाणे २०१४ला रायगड लोकसभेची निवडणूक लढवत १ लाख ३० हजार मते मिळाली. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदार संघात पक्षाने नवीन उमेदवार दिला तरीही त्यांचे रात्रंदिवस काम करून उमेदवाराला विजयापर्यंत नेऊ शकलो. शरद पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार, जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली; मात्र पक्षातील काहींनी विरोध केल्याने जिल्हाध्यक्षपदी निवड पुढे ढकलण्यात आली. यातून पक्षस्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. अद्याप जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला नाही. पालिकेच्या निवडणुकीत पक्षाला उभारणी मिळण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो आणि उमेदवारही दिले; मात्र अल्पशा मताने पराभव झाला. या निवडणुकीच्या काळात वरिष्ठांकडून कोणताही संपर्क करण्यात आला नाही. पक्षाच्या कठीण परिस्थितीत लढा देताना, प्रामाणिकपणे काम करतानाही एकाकी पाडण्यात आले. पक्षाला आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज नाही. नाइलाजाने प्रांतिकच्या उपाध्यक्षपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे; परंतु अन्य नेत्यांकडून सहकार्य मिळाले नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
---
कोट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत असतानाही वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच पक्षाचा राजीनामा दिला. पुढील राजकीय वाटचाल अद्याप स्पष्ट केलेली नाही.

- रमेश कदम, माजी आमदार, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com