विद्यानिकेतन शाळेचे चित्रकला स्पर्धेत यश
विद्यानिकेतन शाळेचे
चित्रकला स्पर्धेत यश
वेंगुर्लेः सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ले येथील विद्यार्थ्यांनी नवनीत ड्रॉईंग कॉम्पिटिशन २०२५ या चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. गट क्रमांक १ (पहिली ते तिसरी)-या गटामध्ये विहान सपकाळ व युवराज शिरोडकर यांनी उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर विजेतेपद मिळविले. गट क्रमांक २ (चौथी ते सहावी)-या गटात हर्षाक टेमकर व स्वराली मुणनकर यांनी विजेतेपद पटकावले. गट क्रमांक ३ (सातवी ते दहावी)-या गटामध्ये पार्श्वी देवजी व दुर्वांक मालवणकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर व सेक्रेटरी आनंद परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
....................
आसोली परिसरात
रस्ताकामांना प्रारंभ
वेंगुर्लेः तालुक्यातील आसोली ग्रामपंचायत हद्दीतील आसोली, फणसखोल, धाकोरे, आजगाव मुख्य रस्ता ते घनःश्याम गावडे यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संघटक सुनील डुबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक जनसुविधा अंतर्गत या मंजूर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, सुनील मोरजकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, संजय गावडे, उपसरपंच संकेत धुरी, नंदकुमार घाडी, प्रथमेश सावंत, ग्रामस्थ जनार्दन गावडे, शशिकांत गावडे, दिलीप गावडे, नीळकंठ गावडे, शैलेश गावडे, नारायण गावडे, हरी गावडे, संदेश गावडे, श्याम गावडे, सुरेश नाईक, प्रदीप गावडे, शंकर गावडे, संतोष गावडे आदी उपस्थित होते.
...................
शिरोड्यात शिवसेनेतर्फे
गणेशघाटाचे लोकार्पण
वेंगुर्ले ः शिरोडा येथील प्र. क्र. ४ मधील गणेश घाटासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून गणेश घाट मंजूर करण्यात आला. गणेश घाटाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे लोकार्पण शिवसेनेचे पदाधिकारी, महिला तालुकाप्रमुख शीतल साळगावकर यांच्याप्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी शिरोडा सरपंच लतिका रेडकर, वेंगुर्ले पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य अनिष्का गोडकर, सदस्य पांडुरंग नाईक, माजी सदस्य बाळा मयेकर, विभाग प्रमुख अमित गावडे, दाजी गावडे, श्रीकृष्ण गावडे, गणेश गोडकर, वैभव मांजरेकर, विठ्ठल परब, नागेश गोडकर, गुरुनाथ गावडे, दत्तराज परब, आदित्य गोडकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
......................
आडेलीत उद्या
वार्षिक जत्रोत्सव
वेंगुर्ले ः आडेली-भंडारवाडी येथील ब्राह्मणदेवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता. १६) साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पूजन, केळी-नारळ ठेवणे, श्री सत्यनारायण महापूजा, रात्री पार्सेकर नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी दर्शनासह जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
.....................
सावंतवाडीत पाठशाळेची
रविवारी वार्षिक सभा
सावंतवाडी ः येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १८) आयोजित केली आहे. ही सभा संस्थेच्या सभागृहात दुपारी ३ वाजता होईल. या सभेमध्ये संस्थेच्या आगामी धोरणांवर आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे आणि नियोजित कामकाजात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पाठशाळा कार्यकारिणीच्या वतीने कार्यवाह घनःश्याम गणपुले यांनी केले आहे.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

