चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीचा लागणार कस

चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीचा लागणार कस

Published on

चिपळूण-संगमेश्वरात राष्ट्रवादीचा लागणार कस
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ; आमदार निकमांची सत्त्वपरीक्षा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण ता. १५ ः चिपळूण पालिका निवडणुकीतील पराभवाचे शल्य पचवून स्वबळाचा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत आमदार शेखर निकम यांचा कस लागणार आहे. शिवसेना-भाजप युती निश्चित असून, महाविकास आघाडीचे अद्याप तळ्यातमळ्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) अस्तित्व टिकवण्यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात प्रयत्न करावे लागणार आहेत.
चिपळूण पंचायत समितीच्या १८ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ९ गटासाठी तालुक्यात निवडणूक होत आहे. यासाठीची आचारसंहिता १३ रोजी लागू झाली असली तरीही राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निवडणूक तयारीत गुंतलेले आहेत. गतवेळी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी शिवसेना व भाजपने युती केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच आमदार निकम यांच्या उपस्थितीत उमेदवार निश्चित करून स्वबळाचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढण्याच्या भूमिकेत असल्याचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी काही दिवसापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे समोर आले आहे. ठाकरे सेना तसेच काँग्रेसची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फसगत होऊ नये यासाठी आमदार निकम जोमाने कामाला लागले आहेत.
पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला गेल्या २० वर्षात यश मिळालेले नाही; मात्र भाजपनेते प्रशांत यादव यांनी पालिका निवडणुकीत कमळ फुलवल्याने पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. युतीचे बहुतांशी गण आणि गटात उमेदवार निश्चित झाले असून, ते कामाला लागले आहेत.

------
चौकट
उमेदवारीसाठी चुरस
तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटात ७ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. केवळ दोन प्रभाग सर्वसाधारण राहिले आहेत. त्यामुळे कोकरे आणि उमरोली गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. पंचायत समितीच्या १८ गणांत ही निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कुटरे, गुढे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अलोरे व मांडकी नागरिकांचा मागास प्रवर्ग तर भोम, कोकरे, निवळी, कळवंडे, चिंचघरी, पिंपळी, शिरगांव, दळवटणे गण सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहे तसेच पेढे, खेर्डी, वेहेळे, सावर्डे, उमरोली, वहाळ गण सर्वसाधारण प्रवर्गात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com