नृत्याविष्कारांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

नृत्याविष्कारांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन
Published on

swt1523.jpg
O17970
सांगेली ः पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव विविध कार्यक्रमांनी यादगार ठरला.
(छायाचित्र ः अजय सावंत)

नृत्याविष्कारांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन
सांगेली ‘नवोदय’चा महोत्सव ः विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः महाराष्ट्र राज्याच्या विविध लोककलांसह गुजरात, राजस्थान येथील संस्कृतीचे विविधांगी नृत्याविष्कारातून  सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय मुलांनी दर्शन घडवित सांस्कृतिक महोत्सव यादगार ठरवला. मुलांनी सादर केलेल्या या विविध कलागुणांचे पालक, शिक्षकांनी कौतुक केले.
केंद्राच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीचा सांस्कृतिक महोत्सव प्रशालेच्या प्रांगणात नुकताच पार पडला. महोत्सवाचे उद्घाटन प्रा. अशोक कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. कांबळे यांनी, नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्ग शिक्षणाचे धडे घेतानाच सांस्कृतिक क्षेत्रातही पुढे सरसावला आहे. अभ्यासाबरोबरच त्यांना नृत्य, गायन, कला यांचे ज्ञान होणे गरजेचे आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही प्रशालेने विविध पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. मुलांचे कलागुण कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे यावेत, या उद्देशाने दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव घेतला जातो, असे सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात श्री गणेश वंदनाने करण्यात आली. या महोत्सवात महाराष्ट्राची लोककला नृत्य, गायन, वादन या विविध कार्यक्रमांतून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेबरोबरच गुजरात, राजस्थान तसेच दक्षिण भारतीय रिमिक्स नृत्य, भरतनाट्यम आदी कलाविष्कार दाखविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर केलेली कला विशेष उल्लेखनीय ठरली. लोकनृत्य, राधानृत्य, समूहनृत्य, मूकनाट्य, लावणी आदी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. मुलांनी योगा सादरीकरण केले. या महोत्सवात सहावी ते अकरावीची मुले सहभागी झाली. मुलांच्या कलागुणांनी शिक्षक, पालकवर्ग मंत्रमुग्ध झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोषकुमार यादव यांनी, सूत्रसंचालन सौख्या कांबळे, भूमी यांनी केले. एमओडी श्रीमती प्राजक्ता यांनी आभार मानले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन सौख्या कांबळे, गायत्री पाटील, श्रेया वरदम, श्रेया गवस यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com