पर्यावरणाचा समतोल राखणारी खारफुटी जगवा

पर्यावरणाचा समतोल राखणारी खारफुटी जगवा
Published on

rat१५p२४.jpg-
२६O१७९४५
रत्नागिरी : सागर महोत्सव- सीव्हर्सअंतर्गत गुरूवारी सूर्योदयाच्या वेळेस कर्ला येथून चिंचखरीच्या दिशेने खारफुटी अभ्याससहलीस सुरुवात झाली.
rat१५p२५.jpg-
P२६O१७९४७
रत्नागिरी : कर्ला, चिंचखरीदरम्यान असलेले खारफुटीचे बेट.
rat१५p२६.jpg-
२६O१७९४९
रत्नागिरी : मिरची खारफुटीची फुले.
rat१५p२७.jpg-
rat१५p२८.jpg-
२६O१७९५१
रत्नागिरी : खारफुटी अभ्याससहलीत सहभागी विद्यार्थी, अभ्यासक, निसर्गप्रेमी.
rat१५p२९.jpg-
P२६O१७९५२
रत्नागिरी : चिंचखरी येथे मोठ्या प्रमाणावर वाढलेली खारफुटी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
२६O१७९५०
रत्नागिरी : चिंचखरी येथे खारफुटींची माहिती तज्ज्ञ हेमंत कारखानीस यांनी दिली.
-----
पर्यावरणाचा समतोल राखणारी खारफुटी जगवा
अभ्याससहलीतून बिजारोपण; ‘आसमंत’च्या सागर महोत्सवाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : कर्ला ते चिंचखरी खाडीकिनाऱ्याच्या विस्तीर्ण प्रदेशात असलेल्या खारफुटी जंगलाच्या संवर्धनाचे बीज आज अभ्याससहलीच्या निमित्ताने रोवले गेले. निमित्त होते आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवाचे सीव्हर्स. आज सकाळी ७ ते ११ या वेळेत १००हून अधिक विद्यार्थी, अभ्यासूंनी या खारफुटी जंगलाची सफर करत खारफुटीचे महत्त्व जाणून घेतले. किनारी भागासह पर्यावरणाचा समतोल राखणारी खारफुटी जगली पाहिजे व तिचे जतन केले पाहिजे यासाठी ही सफर महत्त्वाची ठरली.
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित चौथ्या सागर महोत्सवाला आज खारफुटी अभ्याससहलीने सुरुवात झाली. कर्ला येथील सुशेगाद जलविहारच्या माध्यमातून जोडलेल्या दोन होड्यांमधून तीन फेऱ्यांद्वारे १०० विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि पर्यटकांनी सहभाग घेतला. खारफुटी अभ्यासक हेमंत, शांभवी चव्हाण यांनी खारफुटीची इत्थंभूत माहिती दिली. खाडीकिनाऱ्यावरील पक्षी, जैवविविधता यांचा मनसोक्त आनंद सर्वांनी घेतला.
सफरीदरम्यान, ब्राह्मणीघार, बगळा, पाणकावळा, कावळे, कबुतरे पाहायला मिळाले. कर्ला येथील सुशेगाद जलविहारच्या संजीव लिमये व कौस्तुभ लिमये यांचे या सहलीकरिता सहकार्य लाभले. आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन, संचालक नितीन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे यांनीही या सहलीत भाग घेतला व सागर महोत्सवाची संकल्पना विषद केली.
कर्ला, चिंचखरी परिसरात महाराष्ट्राचे राज्य खारफुटी झाड पांढरी चिपी मोठ्या प्रमाणात येथे आहे. सूड खारफुटीची झाडेही चिंचखरी येथे पाहायला मिळाली. या झाडाचा पांढरा चीक डोळ्यात गेल्यास दोन-तीन तास अंधत्व येऊ शकते. दलदल आहे, खारे पाणी, भरती -ओहोटीमुळे जमिनीची धूप, मुळे श्वास घेऊ शकत नाहीत, लाटा येतात त्यामुळे झाड तग धरू शकत नाही, अशा प्रतिकूल स्थितीतही खारफुटी जगते आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो. ही झाडे कार्बनडाय ऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडतात, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

------
चौकट १

खारफुटीची पाने प्रदूषण रोखते
खाऱ्या व गोड्या पाण्यात राहणारी खारफुटी झाडांची मुळे, पाने वेगवेगळी असतात. खारफुटी वनस्पतींची जंगले वाढण्याची गरज आहे. भरती-ओहोटीच्या काळातही ही खारफुटी तग धरून राहू शकते. येथे अनेक प्रकारचे प्राणी वास्तव्याला येतात. यात अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, मासे, खेकडे, जलचर यांसह खारफुटीची पाने खाण्यासाठी वानरही येतात. खारफुटी वनस्पती हवेतील कार्बन शोषून घेते. प्रदूषण रोखू शकते, अशी माहिती हेमंत कारखानीस यांनी दिली.
-----
चौकट २
मिरची खारफुटीत मधुमक्षिकापालन
ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये कोळी, शेतकरी जोडधंदा म्हणून खारफुटीमध्ये मधुमक्षिका पालन करतात. त्यातून जास्त उत्पन्न मिळण्यासाठी सर्वांत जास्त मध देणाऱ्या झाडांचा शोध संशोधकांनी सुरू केला. त्या वेळी मिरची खारफुटी (रिव्हर मॅंग्रूव्ह) म्हणजे गोड्या पाण्याचे आधिक्य असलेल्या ठिकाणी आढळणाऱ्या या खारफुटीची निवड करण्यात आली. कारण, या झाडाच्या पांढऱ्या कळ्या, फुले गुच्छामध्ये असतात. फुलांपासून फळे बनतात त्या वेळी ती गुच्छात असतात. या फळांचा आकार लवंगी मिरचीसारखा असतो. पक्व होतात तेव्हा लाल रंगाची मिरचीप्रमाणे दिसतात. मॅंग्रूव्हच्या सर्व जातीत मध देणारे हे झाड आहे. याकडे मधमाशा आकृष्ट होतात. वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा खारफुटीतील मध हा महागडा असतो. यातील अनेक झाडे चिंचखरी येथे आढळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com