जानवली नदीपात्रात बंधारा
उभारा ः वैभव मालंडकर

जानवली नदीपात्रात बंधारा उभारा ः वैभव मालंडकर

Published on

18137

जानवली नदीपात्रात बंधारा
उभारा : वैभव मालंडकर

नगराध्यक्ष पारकर यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ : शहरातील गणपती साना येथील जानवली नदीपात्रात बंधारा उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव मालंडकर यांनी केली आहे. श्री. मालंडकर यांनी याबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन दिले. यावेळी नीलेश पवार, नयन यादव, प्रथमेश परब, तुषार गोळवणकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, गडनदीच्या धर्तीवर जानवली नदीपात्रात बंधारे होणे आवश्‍यक आहे. या नदीपात्रात बंधारा नसल्‍याने मे महिन्यात या भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. जर बंधारा झाला तर या भागातील विहिरींना मुबलक पाणी उपलब्‍ध होणार आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा झाला तर बोटिंग सुविधाही सुरू करणे शक्‍य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com