निवडणूक महाविकास आघाडीनेच लढवणार

निवडणूक महाविकास आघाडीनेच लढवणार

Published on

- rat१६p९.jpg-
P२६O१८१४८
दापोली ः येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव.
-----
निवडणूक महाविकास आघाडीनेच लढवणार
विक्रांत जाधव ः दापोलीत प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी थेट मतदारांपर्यंत पोहोचून महाविकास आघाडीची भूमिका प्रभावीपणे मांडली पाहिजे, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केले.
दापोली दौऱ्यावर असताना शहरातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी जाधव म्हणाले, दापोली तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांमध्ये मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाची ताकद ठळकपणे दिसून आली आहे. काही नेते अन्य पक्षांत गेले असले तरी शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पेटलेल्या निखाऱ्यावर फुंकर मारण्याची गरज असून, त्यातून निर्माण होणाऱ्या वणव्यात गद्दार जळून खाक होतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रूमाणे, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र धाडवे, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर तसेच विविध विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
-----
चौकट
भगवा फडकवणारच ः जाधव
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊनच उमेदवार जाहीर केले जातील. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गटाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर निष्ठेचा भगवा फडकवायचा आहे, असे आवाहन जाधव यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com