नासा आणि इस्रोकरिता सहा विद्यार्थिनींची निवड

नासा आणि इस्रोकरिता सहा विद्यार्थिनींची निवड
Published on

नासा, इस्रोकरिता सहा विद्यार्थिनी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ ः केंद्र ते जिल्हास्तर विविध चाचणी परीक्षा, प्रयोग प्रात्यक्षिकातून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून नासा आणि इस्रोकरिता सहा विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यात चंद्रनगर या एकाच शाळेतील आरोही मुलुख आणि नीरजा वेदक या दोन विद्यार्थिनी तर दीक्षा येसवारे (किन्हळ), अक्षरा पाटील (विरसई), प्रांजल खळे (नवशी) आणि सृष्टी कोठावळे (हर्णे नं.१) या विद्यार्थिनींची इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतीलच आहेत त्यामुळे या विद्यार्थिनींचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. लवकरच या सर्व विद्यार्थिनी गगनभरारी घेणार आहेत. दापोलीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्यासह विस्तार अधिकारी बळीराम राठोड, नजीर वलेले, केंद्रप्रमुख सुनील कारखेले, शाळेतील सर्व शिक्षक यांनी नासा आणि इस्रोमध्ये अभ्यासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे आणि पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com