अभिनय कार्यशाळा चेंदवणमध्ये उत्साहात
अभिनय कार्यशाळा
चेंदवणमध्ये उत्साहात
कुडाळः चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे होते. यावेळी संस्थेचे सदस्य संजय नाईक, अभिनय कार्यशाळेचे मार्गदर्शक केदार देसाई व निलेश जोशी, मुंबईहून विशेष उपस्थित असलेले अवधूत भिसे, गोविंद भरडकर, मुख्याध्यापक माणिक पवार, पालक प्रतिनिधी दादा करलकर तसेच कवठीचे पोलीस पाटील विठ्ठल राणे उपस्थित होते. या कार्यशाळेत चेंदवण हायस्कूल, चेंदवण प्राथमिक शाळा तसेच कवठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. श्री. शृंगारे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या सत्रात केदार देसाई, दुसऱ्या सत्रात निलेश जोशी तर तिसऱ्या सत्रात अवधूत भिसे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्ती सांगळे यांनी कार्यशाळेची सुरुवात केली. त्यानंतर अवधूत भिसे यांनी दुसरे सत्र घेतले. सायंकाळी झालेल्या समारोप कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे, अवधूत भिसे, अशोक आठलेकर, मुख्याध्यापक माणिक पवार, संतोष सांगळे, कवठीच्या सरपंच स्वाती करलकर, पालक प्रतिनिधी स्वाती राणे उपस्थित होते. सूत्रसंचालन उर्मिला गवस यांनी केले. मुख्याध्यापक माणिक पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उमेश धर्णे यांनी केले.

