गुहागरमध्ये कासवाची ३३ पिल्ले समुद्रात विसावली
rat16p14.jpg
18174
गुहागरः समुद्राकडे जाणारी कासवाची पिल्ले.
--------
कासवाच्या ३३ पिल्लांची समुद्राकडे धाव
गुहागरमध्ये १२८ अंड्यांचे संरक्षण; सहा केंद्रात संवर्धन
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १६ : मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून ३३ कासव पिल्लांचा जन्म झाला असून, ही पिल्ले समुद्रात झेपावली.
गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात कासव अंड्यांचे संरक्षण केले जात आहे. समुद्रकिनारी ६ कासव अंडी उबवणी केंद्र उभारण्यात आली असून, संवर्धनासाठी ११ कासवमित्रांची नेमणूक केली आहे. गुहागर किनारी ऑलिव्ह रिडले या जातीचे मादी कासव अंडी घालण्यासाठी हजेरी लावत आहेत. पाऊस थांबल्यानंतर कासवविणींचा हंगाम सुरू झाला. १७ नोव्हेंबर २०२५ला गुहागरमध्ये १२८ अंड्यांचे पहिले घरटे सापडले होते. ही अंडी संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून ३३ पिल्लांचा जन्म बुधवारी मंकर संक्रातीच्या मुहुर्तावर झाला. दक्षिण कोकण कांदळवन विभाग विभागीय वनाधिकारी कांचन पवार, रत्नागिरी कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, कासवमित्र संजय भोसले व त्यांची ११ कासवमित्रांची टीम कासव संवर्धनाचे काम करत आहे. बुधवारी जन्मलेल्या ३३ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्यात आले. पिल्ले समुद्रामध्ये सोडताना वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता मंदार छत्रे, कासवमित्र संजय भोसले, शार्दुल तोडणकर, साहिल तोडणकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

