राज्य निवड अमॅच्युअर बुद्धिबळ स्पर्धा रत्नागिरीत सुरू
rat१६p१९.jpg-
P२६O१८१८६
रत्नागिरी : रामचंद्र सप्रे स्मृती राज्य निवड अमॅच्युअर बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन पटावर चाल करून करताना श्रीराम खरे व माधव हिर्लेकर. डावीकडून डॉ. शरद प्रभुदेसाई, सुभाष शिरधनकर, शशिकांत मोदी, डॉ. श्रीकृष्ण जोशी व भरत चौगुले.
------
लोगो.... कै. रामचंद्र सप्रे स्मृती स्पर्धा
रत्नागिरीत बुद्धिबळाची रणधुमाळी
सप्रे स्मृती राज्य निवड स्पर्धा ; १४४ खेळाडूंचा सहभाग, उद्या बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद विजेते (कै.) रामचंद्र सप्रे स्मृती महाराष्ट्र राज्य निवड अमॅच्युअर बुद्धिबळ स्पर्धेस येथील मराठा भवनमध्ये प्रारंभ झाला. यात २३ जिल्ह्यातील १४४ खेळाडूंनी भाग घेतला असून, त्यातील ८२ खेळाडू हे फिडे गुणांकन प्राप्त आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पंधरा वर्षाखालील एकूण १०० पेक्षा अधिक बाल बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे, केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आले. या प्रसंगी केजीएनचे उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सचिव ऋचा जोशी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत मोदी, सुभाष शिरधनकर, राज्य संघटनेचे खजिनदार व मुख्य पंच भारत चौगुले आणि सुहास कामतेकर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी खरे यांनी राज्य संघटनेने आपल्याकडे कोकणपट्ट्यांच्या बुद्धिबळ विकासाची जबाबदारी दिली आहे. आजची स्पर्धा ही त्याचीच पहिली पायरी असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर उत्तरोत्तर अधिकाधिक उपक्रम राबवण्यात आपण अग्रेसर राहू, असे सांगितले.
माधव हिर्लेकर यांनी सप्रे स्मृती स्पर्धेच्या इतिहासाचा मागोवा घेत आज होऊ घातलेल्या पहिल्यावहिल्या क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धेची संधी दिल्याबद्दल राज्य संघटनेचे आभार मानले. १३ वर्षे अविरत चालू असलेली ही स्पर्धा पुढेही सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला. स्पर्धेसाठी एच२ई-पॉवर सिस्टिमचे सहकार्य लाभले आहे.
-----
चौकट १
मातब्बर खेळाडू
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रजित महिंद्रकर, नागपूरचा शुभम लाकूडकर आणि कौस्तुभ बरात, कोल्हापूरचा आदित्य सावळकर , सांगलीचा आदित्य चव्हाण, पुण्याचा साहिल शेजळ व ओम रामगुडे हे अग्रमानांकित खेळाडू असून, स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. स्पर्धेत पंच म्हणून भरत चौगुले, प्राची मयेकर, पौर्णिमा उपळाविकर माने, मनीष मारूळकर व शशिकांत मक्तेदार काम पाहत असून, सर्व तांत्रिक जबाबदारी विवेक सोहनी व चैतन्य भिडे पार पाडत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

