खेमराज मेमोरियल, तोरसकर
महाविद्यालयाला विजेतेपद

खेमराज मेमोरियल, तोरसकर महाविद्यालयाला विजेतेपद

Published on

18263

खेमराज मेमोरियल, तोरसकर
महाविद्यालयाला विजेतेपद

सिंधुदुर्गनगरीतील क्रिकेट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित शालेय क्रिकेट स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
या संघात अथर्व केसरकर, परशुराम गावडे, आर्यन गावकर, अर्जुन पाटील, गुरुप्रसाद धारगळकर, लवू नाईक, रुपेश देसाई, यशवंत बांदेकर, मंथन गावडे, आर्यन जाधव, आयुष वालवलकर, अनंत सावंत, ओंकार झाट्ये या खेळाडूंचा सहभाग आहे. क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ यांचे मार्गदर्शन लाभले. हा संघ कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हसवड (ता. माण, जिल्हा सातारा) येथे रवाना झाला आहे. या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक पी. यू. देसाई यांनी आज महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पर्यवेक्षक पी. एस. सावंत, अरुण सुतार, अनिकेत सावंत, मिलिंद वळवी, सुमेधा सावळ, अमृता पिळणकर, संजना गवस, दीपा सावंत शुभा गावडे आदी शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com