आवाशी येथे मोफत  आरोग्य तपासणी शिबिर

आवाशी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Published on

rat१७p४.jpg -
P२६O१८३७७
चिपळूण ः शिबिरात रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी.

आवाशीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः एस. आय. ग्रुप इंडिया प्रा. लि. लोटे यांच्या आर्थिक सहकार्याने व रोटरी क्लब लोटे यांच्या पुढाकाराने आवाशी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात चिपळुणातील लाइफकेअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. सुमारे २०० ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.
लोटे येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून सातत्याने समाजासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. आवाशी येथील आरोग्य तपासणी शिबिरात रक्त, लघवी, रक्तदाब तपासण्या घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधपुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल खेडच्या माध्यमातून जर्मन बेस मशिनवर डोळ्यांची पूर्ण तपासणी करून मोतीबिंदू व चष्म्याचे नंबर सांगण्यात आले. येथे ५० टक्के सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. या वेळी प्लान्ट हेड चव्हाण यांनी ग्रामस्थांना सुदृढ आयुष्यासाठी नियमित व्यायाम व पौष्टिक आहाराचा सल्ला दिला. सरपंच आंब्रे यांनी आजारी पडण्यापेक्षा पूर्वकाळजी घेऊन वेळीच तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी एसआय ग्रुपचे प्लँट हेड चव्हाण, व्यवस्थापक राहुल पवार, सेफ्टी हेड काळे, आवाशी सरपंच मनोज आंब्रे, रोटरी अध्यक्ष संदीप सुर्वे, मिहीर वारणकर, चेतन वारणकर, रोट्रॅक्टचे तुषार खताते, विक्रम पवार, अनिकेत काते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com