-गणेशगुळ्यातील मंदिरात उद्यापासून माघी गणेशोत्सव

-गणेशगुळ्यातील मंदिरात उद्यापासून माघी गणेशोत्सव

Published on

-rat१७p१०.jpg-
P२६O१८४०१
पावस ः गणेशगुळे येथील प्रसिद्ध गणेशमंदिर.
-----
गणेशगुळेत उद्यापासून माघी गणेशोत्सव
विविध कार्यक्रमांचे आयोजन; चार नाटकांची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ ः रत्नागिरीत तालुक्यातील गणेशगुळे येथील स्वयंभू गणेशमंदिरात माघी गणेशोत्सव १९ ते २२ जानेवारी या कालावधीत साजरा केला जाणार आहे.
उत्सवादरम्यान दररोज सकाळी ६.३० वा. विधीवत गणेशपूजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, ८ वा. आणि सायं. ६ वा. आरती होईल. १९ ला सायंकाळी ७ वा. ढोलवादन स्पर्धा होणार असून, बक्षीस वितरण लगेच ९.३० वा. केले जाईल. त्यानंतर १० वा. अक्षय थिएटर्सतर्फे इम्युनिटी हे नाटक सादर केले जाईल. २०ला रात्री १० वा. अजिंक्यतारा थिएटर्सचे साई माझी माय माऊली हे नाटक होईल. २१ला दुपारी १ वा. श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे (भडे) अशोक सुर्वेबुवा यांचे भजन होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत हळदीकुंकू व अधिरा गुरव, आयांश गुरव यांच्याकडून लाडू वाटप केले जाईल. दुपारी ३ वा. विठ्ठल रखुमाई भजन मंडळ (कुवारबाव) यांचे भजन, सायं. ७ वा. बुवा किरण कीर (नांतुडे) यांचे भजन होईल. रात्री १० वा. तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळ (मुंबई) यांचे वाडा चिरेबंदी हे नाटक होईल. २२ला सकाळी ९ वा. हदय लाड व रामचंद्र बांगर यांच्याकडून सरबत वाटप, ११ ते १२ या वेळेत कीर्तनकार उल्हास लाड (कसोप) यांचे जन्मोत्सव कीर्तन होईल. दुपारी १२ वा. श्रींची पालखी मिरवणूक, १२ ते ३ या वेळेत हदय लाड व रामचंद्र बांगर यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप केले जाईल. दुपारी १ वा. बुवा दामोदर लोकरे (मुंबई) यांचे भजन, ३ वा. काडसिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे (गणेशगुळे) बुवा संदेश तोडणकर यांचे भजन होईल. रात्री ९ वा. देणगीदार, नाटककार यांचे आभार प्रदर्शन व क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाईल. १० वा. प्र. ल. मयेकर लिखित दोनअंकी नाटक वास्तव हे लाड ऐक्यवर्धक नाट्य मंडळ (मुंबई) सादर करेल. या विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर गणेशगुळेचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com